Samruddhi Mahamarg Biggest Benefit: समृद्धी महामार्गामुळे लुटालूट, दादागिरीपासून होईल सुटका; ट्रक चालक सरदारजी म्हणतो...ये रोड बडा चंगा है!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 11:02 AM2022-12-15T11:02:37+5:302022-12-15T11:08:33+5:30

३५ ते  ४० टन वजनाची गाडी चालवितो, तेव्हा पाठीमागून येणारा दुचाकीस्वार, कारचालक यांना तत्काळ  ‘साइड’ हवी असते. थोडा जरी विलंब झाला तर...

Samruddhi Mahamarg will get rid of looting, bullying; Truck Driver Sardarji Says...Yeh Road Bada Changa Hai! | Samruddhi Mahamarg Biggest Benefit: समृद्धी महामार्गामुळे लुटालूट, दादागिरीपासून होईल सुटका; ट्रक चालक सरदारजी म्हणतो...ये रोड बडा चंगा है!

Samruddhi Mahamarg Biggest Benefit: समृद्धी महामार्गामुळे लुटालूट, दादागिरीपासून होईल सुटका; ट्रक चालक सरदारजी म्हणतो...ये रोड बडा चंगा है!

Next

साहेबराव नरसाळे/ अरुण वाघमोडे
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : ‘ये रोड बडा चंगा है... बीच में कोई रुकावट नहीं. ट्रक चलाते समय बाईक, कारवालों की गालीगलोच, दबंगगिरी से बचेंगे और जहाँ भी जाना है वहा समयपर पहुचेंगे... भाई, इस रोड पर हमें अब इज्जत मिलेगी...’ असं समृद्धी महामार्गाबद्दल ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील ट्रकचालक सरदूर सिंग भरभरून बोलत होता. 

ट्रकचालक सरदूर सिंग (ग्वाल्हेर)  भेटले. ‘सरदारजी, कैसा है ये महामार्ग?’ या प्रश्नावर सरदारजी भरभरून बोलायला लागले. ‘भाई, पैंतीस, चालीस साल से ट्रक चला रहा हूँ... भारत का हर एक बडा हायवे देखा है लेकिन ये सिमेंट का समृद्धी व्हायवे बहोत बढीया है. यहां काेई रुकावट नहीं...’ ३५ ते  ४० टन वजनाची गाडी चालवितो, तेव्हा पाठीमागून येणारा दुचाकीस्वार, कारचालक यांना तत्काळ  ‘साइड’ हवी असते. थोडा जरी विलंब झाला तर काहीजण थेट शिवीगाळ करतात. काहीवेळा तर थेट ट्रक अडवून हात उचलण्याचाही प्रयत्न करतात. अनेकदा आमच्या वाहनाच्या काचाही फोडल्या आहेत. आता या महामार्गावर आमची सर्व त्रासातून सुटका झाली आहे. सरकारने शिर्डी ते मुंबई रोडही लवकरच तयार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

‘दाब क्लच, बदल गीअर’मधून सुटका 
 या महामार्गावर अडथळे नसल्याने ‘दाब क्लच, बदल गीअर, फिरव स्टिअरिंग’ यामधून वाहनचालकांची सुटका झाली आहे. तथापि या महामार्गावर कुत्र्यांचा सर्वाधिक अडथळा आहे. तसेच वानर, हरणांचे कळपही रस्त्याच्या कडेला लावलेल्या संरक्षक कठड्यावरून उड्या मारून पळताना दिसतात. 

शेतातून रस्ता गेल्याने आम्हाला सरकारने चांगला मोबदला दिला. या महामार्गावर अनेक प्रकल्प उभे राहत आहेत. हे प्रकल्प कार्यान्वित होतील, तेव्हा परिसरातील विकासाला चालना मिळेल.
- दौलत माळी, 
शेतकरी सवंत्सर, कोपरगाव शेतकरी

महामार्गावरून खाली उतरण्यासाठी ठरावीक ठिकाणीच रस्ते आहेत. त्यामुळे या महामार्गावर निश्चित ठिकाणी असलेल्या हॉटेलमध्येच प्रवासी जाणार आहेत. आमच्यासारख्या छोट्या टपरीवाल्यांनाही संधी मिळावी.
- रवींद्र ठाकरे, 
हॉटेलचालक, वडगाव (ता. हिंगणा)

Web Title: Samruddhi Mahamarg will get rid of looting, bullying; Truck Driver Sardarji Says...Yeh Road Bada Changa Hai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.