समृद्धी महामार्गावरून विरोधक आक्रमक, गदारोळामुळे दोनदा कामकाज तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:01 AM2017-08-02T01:01:32+5:302017-08-02T01:01:35+5:30

मुंबई-नागपूर या प्रस्तावित समृद्धी महामार्गासाठी शेतकºयांकडून जबरदस्तीने जमिनी घेतल्या जात असल्याचा आरोप करत, विरोधी पक्षांनी आक्र मक भूमिका घेतल्यामुळे विधान परिषदेचे कामकाज मंगळवारी दोन वेळा तहकूब झाले.

From the Samrudhiyi highway, the opponent is aggressive and aggressive | समृद्धी महामार्गावरून विरोधक आक्रमक, गदारोळामुळे दोनदा कामकाज तहकूब

समृद्धी महामार्गावरून विरोधक आक्रमक, गदारोळामुळे दोनदा कामकाज तहकूब

Next

मुंबई : मुंबई-नागपूर या प्रस्तावित समृद्धी महामार्गासाठी शेतकºयांकडून जबरदस्तीने जमिनी घेतल्या जात असल्याचा आरोप करत, विरोधी पक्षांनी आक्र मक भूमिका घेतल्यामुळे विधान परिषदेचे कामकाज मंगळवारी दोन वेळा तहकूब झाले.
काँग्रेसचे सदस्य संजय दत्त यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. या वेळी त्यांनी शेतकºयांचा विरोध असताना, सरकार पोलीस बळाचा वापर करून जमीन संपादित करत असल्याचा आरोप केला.
सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी त्याला उत्तर दिले. शेतकºयांच्या संमतीनंतर त्यांना पूर्ण नुकसानभरपाई देऊन, त्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेत. ३९२ प्रकल्पग्रस्त गावांपैकी आतापर्यंत ३७१ गावांतल्या जमिनी शेतकºयांच्या संमतीने संपादित करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी शहापूर, नाशिक आणि इगतपुरी जिल्ह्यांत किती शेतकºयांनी संमती दिली, असा सवाल केला. त्यावर मंत्रीमहोदयांनी विरोधकांचे समाधान करणारे उत्तर दिले नाही. त्यामुळे विरोधक आक्र मक झाले. सभापतींनी या सूचनेवरील उत्तर राखून ठेवले.

Web Title: From the Samrudhiyi highway, the opponent is aggressive and aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.