सनातन संस्था आरोपीच्या पाठीशी!

By admin | Published: September 19, 2015 04:52 AM2015-09-19T04:52:37+5:302015-09-19T04:52:37+5:30

कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाड याच्या पाठीशी असल्याचे सनातन संस्थेने शुक्रवारी

Sanatan Sanstha behind the accused! | सनातन संस्था आरोपीच्या पाठीशी!

सनातन संस्था आरोपीच्या पाठीशी!

Next

मुंबई : कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाड याच्या पाठीशी असल्याचे सनातन संस्थेने शुक्रवारी स्पष्ट केले. दांभिक पुरोगाम्यांच्या दबावामुळे ही कारवाई झाल्याचा आरोप सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी पत्रकार परिषदेत केला.
वर्तक म्हणाले, की तांत्रिक कारणास्तव गायकवाड याला अटक झालेली आहे; मात्र त्यावर कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही. तरीही श्याम मानव, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, सचिन सावंत अशा व्यक्ती सनातनवर बंदी घालण्याची मागणी करीत आहेत. न्यायालयात याचिका दाखल करीत पोलीस आणि सरकारी यंत्रणांवर दबाव निर्माण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
पुरोगाम्यांच्या दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे तपास होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश देण्याची मागणी हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर यांनी यावेळी केली. काही व्यक्ती आणि संस्थांचे आर्थिक घोटाळे सनातन संस्थेने उघड केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी सनातनला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय, असे ते म्हणाले. सनातनसोबत हिंदू गोवंश रक्षा समिती, राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ, श्री महाराष्ट्र रामलीला मंडळ या हिंदुत्ववादी संघटनांनी समीरच्या पाठीशी राहण्याचा निर्णय जाहीर केला.

चौघांची ‘इन कॅमेरा’ चौकशी
कोल्हापूर : संशयित आरोपी समीर गायकवाड याच्यासह त्याची प्रेयसी आणि दोघांजवळच्या नातेवाइकांची ‘इन कॅमेरा’ चौकशी सुरू आहे. सुरू असलेल्या चौकशीमध्ये पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. तपासप्रमुख व राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजयकुमार कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. शुक्रवारी संशयितांना विचारलेल्या प्रश्नांसह त्यांनी दिलेल्या उत्तरांची थेट संगणकावर नोंद केली जात होती. तसेच या चौकशीचे व्हिडीओ चित्रीकरण केले जात आहे.

‘सायबर सेल’ परतले
पुणे येथील ‘सायबर सेल’च्या चौघा तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले होते. जप्त केलेल्या मोबाइलवरून व ई-मेल आणि फेसबुकवरून त्याने आतापर्यंत कोणते संदेश (मेसेज) पोस्ट केले आहेत.

Web Title: Sanatan Sanstha behind the accused!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.