दाभोलकर हत्या प्रकरणी सनातनच्या तावडेला अटक

By admin | Published: June 11, 2016 08:32 AM2016-06-11T08:32:24+5:302016-06-11T08:33:55+5:30

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पनवेलमधील डॉक्टर वीरेंद्र तावडे याला संशयावरून अटक केली

Sanatan's arrest in Dabholkar murder case | दाभोलकर हत्या प्रकरणी सनातनच्या तावडेला अटक

दाभोलकर हत्या प्रकरणी सनातनच्या तावडेला अटक

Next
- सीबीआय पथकाची कारवाई
 
पुणो/मुंबई : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ.  नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पनवेलमधील डॉक्टर वीरेंद्र तावडे याला संशयावरून अटक केली आहे. दाभोलकर हत्या प्रकरणातील ही पहिलीच अटक असून हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता असलेल्या तावडे याचा सनातन संस्थेशी संबंध असल्याचा संशय आहे.
याबाबत सीबीआयचे अधीक्षक एस. आर. सिंग म्हणाले, शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सीबीआयच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी बोलावले असताना त्याला अटक करण्यात आली. गेल्या आठवडय़ात सीबीआय न्यायालयाच्या विशेष न्यायधीश बांगड यांनी तावडे याच्या घराच्या झडतीची परवानगी दिली होती. त्यात काही संशयास्पद वस्तू, कागदपत्रे आणि ब:याच गोष्टी सापडल्या. यावरून तावडे याला अटक करण्यात आली आहे.  शनिवारी त्याला पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येईल. वीरेंद्रसिंह तावडे हा कान-नाक-घसा तज्ज्ञ आहे. त्याचा पनवेलजवळील कळंबोली येथे दवाखाना आहे. पनवेलजवळील सनातनच्या आश्रमाजवळच कल्पतरू सोसायटीमध्ये घर आहे. 1 जून रोजी सीबीआयने पुण्यातील सारंग अकोलकर आणि तावडे यांच्या घरांवर छापे टाकले होते. यामध्ये काही संशयास्पद वस्तूंबरोबर त्याचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला होता. तसेच अकोलकर आणि तावडे यांच्यात ई-मेलवरून संपर्क असल्याचे दिसून आले होते. छाप्यानंतर सीबीआयकडून तावडे याला चौकशीसाठी बोलावण्यातही येत होते.
गेली 17-18 वर्षे तो हिंदू जनजागरण समितीशी संलग्न आहे. तो या संस्थेचा पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख होता, तसेच कोल्हापूरचा समन्वयक म्हणूनही त्याने ही जबाबदारी पार पाडली आहे. त्याने डॉ. दाभोलकर यांच्याविरोधात अनेकदा मोर्चेही काढले होते. त्याची पत्नी बालरोगतज्ज्ञ असून तीही हिंदू जनजागरण समितीशी संलग्न आहे. दाभोलकर हत्येनंतर पोलिसांनी जारी केलेल्या रेखाचित्रंशी त्याचा चेहरा मिळताजुळता नसला तरी, डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा कट रचण्यात याचा हात होता, असा संशय आहे. गोव्यातील बॉम्बस्फोटप्रकरणी आधीपासूनच राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) रडारवर असलेल्या आकोलकरच्या पुण्यातील घरासह पनवेलमधील तावडे आणि देवद आश्रमावर सीबीआयने छापे टाकून घराची झडती घेतली होती. याच वेळी दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींची ओळख पटली असून सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समितीनेच हत्या केल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे आशिष खेतान यांनी केला होता. 
 
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात सीबीआयने सनातन संस्थेशी संबंधित एकाला अटक केली ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र, सीबीआयने मुख्य सूत्रधारांर्पयत पोचून पुरावे शोधून काढायला हवेत. त्याचप्रमाणो त्यांच्या मुख्य केंद्रार्पयत सीबीआयचे अधिकारी जाऊन आलेले आहेत. त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेमधून आणखी चौथा खून होण्याची शक्यता व्यक्त झाली होती. यासंबंधी इंग्रजी वृत्तपत्रत वृत्तही प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे  त्यांच्या मुख्य केंद्रांर्पयत पोचून परिवर्तनवादी विचारवंत, कार्यकत्र्याच्या हत्या करणा:यांच्या सूत्रधारांर्पयत सीबीआयने पोचून शोध घेतला पाहिजे.
- डॉ. भारत पाटणकर, नेते, श्रमिक मुक्ती दल
 
 
न्यायालयाच्या निर्णयामुळे हे शक्य
 
न्यायालयाने तपसा यंत्रणांना वेळोवेळी दिलेल्या सूचनांमुळे केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे. या अटकेतून या प्रकरणामागील सूत्रधार उघड होईल. हा एका मोठय़ा कटाचा भाग असू शकतो. त्याचा उलगडाही यामुळे होणार आहे.
- मुक्ता दाभोलकर
 
योग्य दिशेने पावले उचलली असती तर कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्या टळल्या असत्या. उशिराने झालेली अटक असली तरी यामुळे धर्माच्या नावावर अधर्म पसरविणा:या संघटनांचे खरे हिंसक रूप समाजासमोर आले आहे.
- हमीद दाभोलकर, राज्य सरचिटणीस, अंनिस
 
 
अंनिसच्या वतीने लोकशाही मार्गाने सनदशीर लढा देण्यात येत आहे. त्याला मिळालेले हे यश आहे. पोलीसांनी त्यावेळी हत्या झालेल्या परिसरात छापे घातले असते तर हत्येची उकल अगोदर झाली असती. - मिलींद देशमुख, प्रधान सचिव, अंनिस
 
दाभोलकर प्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआयला मागच्या सुनावणीवेळी चांगलेच फटकारले 
होते. तपासाला जर योग्य दिशा नाही मिळाली, तर तुमच्या अधिका:यांना न्यायालयात परेड करावी लागेल, अशा शब्दात न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. त्यानंतरच या तपासाला गती आल्याचे ज्येष्ठ विधीज्ञ अभय नेवगी यांनी सांगितले. 

 

Web Title: Sanatan's arrest in Dabholkar murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.