पुरावे आढळले तरच सनातनवर बंदी - देवेंद्र फडणवीस
By admin | Published: October 5, 2015 12:04 PM2015-10-05T12:04:18+5:302015-10-05T12:40:48+5:30
सनातन संस्थेविरोधात पुरावे आढळले तर संस्थेवर बंदी घालण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्येच्या आरोपाखाली समीर गायकवाड या सनातन संस्थेच्या कार्यकर्त्याला अटक केल्यानंतर सनातनवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागलेली असतानाही सरकारने त्यावर अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही.' सनातनविरोधात कोणतेही पुरावे आढळले तरच संस्थेवर बंदी घालण्यात येईल' असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी सनातनवर कारवाई करताना सरकार कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे म्हटले आहे. सनातन वर बंदी घालण्यात यावी अशी शिफारस करणारा अहवाल महाराष्ट्र सरकारने २०११ साली सादर केला होता, मात्र तत्कालीन केंद्र सरकारने त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही, असेही फडवणीस यांनी सांगितले. कॉ. पानसरेंच्या हत्येप्रकरणी सनातनचा कार्यकर्ता समीर गायकवाडला अटक करण्यात आली असून त्याप्रकरणी पोलिस चौकशीचा अहवाल आल्यनंतरच सनातनवरील कारवाई संदर्भात निर्णय घेण्यात येईल. जर संस्थेविरोधात पुरावे आढळला तर सरकार संस्थेविरोधात कारवाई करेल, मात्र तसे न आढळल्यास आम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.