कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात

By admin | Published: June 7, 2014 10:32 PM2014-06-07T22:32:47+5:302014-06-07T23:56:19+5:30

पीएच.डी. धारकांना नोकरी द्या

In the sanctity of student movement of Agriculture University | कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात

कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात

Next

अकोला : एकाचवेळी नोकरभरती करावी व पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना सहाय्यक प्राध्यापकपदी नियुक्ती करावी, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच आंदोलन करू न कुलगुरू ंना निवेदन दिले आहे. परंतु कुलगुरू ंनी अद्याप याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
गत पाच वषांर्पासून कृषी विद्यापीठाची नोकर भरती प्रक्रिया रखडली आहे. विद्यापीठातील जवळपास अर्ध्याच्यावर पदे रिक्त आहेत. त्यामुळे पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना किमान अकरा महिन्यांच्या कंत्राटावर रुजू करू न घ्यावे, तसेच एकाचवेळी नोकरभरती करावी, खासगी कृषी महाविद्यालये भरमसाठ झाली, पण तेथे गुणवत्ता आहे का, हे तपासावे, २००२ ते २०१२ पर्यंत नोकर भरतीसाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीप्रमाणे जागा भरण्यात याव्यात आदी मागण्यांचे निवेदन विद्यार्थ्यांनी डॉ. उमेश देशमुख यांच्या नेतृत्वात कुलगुरू डॉ.आर.जी. दाणी व कुलसचिव ज्ञानेश्वर भारती यांना दिले आहे. तथापि त्यांच्याकडून समाधान झाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी कार्यालयांना कुलूप ठोको आंदोलन केले. या मागण्याची दखल न घेतल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ. उमेश देशमुख, संदेश बांगर, प्रवीण लहाने, पंकज सोळंके, गौरव गावंडे, नितीन राऊत, विशाल काकड, कुशल राठोड, कपिल माळेकर, योगेश पंडित, स्वाती मगर, विद्या उघडे, दीपाली गोसावी आदींसह शेकडो विद्यार्थ्यांनी दिला आहे.

Web Title: In the sanctity of student movement of Agriculture University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.