वाळू चोरांनी पोखरले चंद्रभागेचे वाळवंट
By admin | Published: November 6, 2016 08:00 PM2016-11-06T20:00:55+5:302016-11-06T20:00:55+5:30
चंद्रभागेच्या वाळवंटात अनेक साधु संतानी वास्तव्य केले. त्या चंद्रभागेचे वाळवंट वाळु चोरांनी पोखरले आहे.
Next
>सचिन कांबळे /ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 6 -
‘ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर! ऐसा विटेवरी देव कोठे’ असे ज्या चंद्रभागेबद्दल संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात अनेक साधु संतानी वास्तव्य केले. त्या चंद्रभागेचे वाळवंट वाळु चोरांनी पोखरले आहे.
चंद्रभागेच्या नदी पात्रातून रोज रात्री, पहाटे व सकाळी गाढवांच्या साहाय्याने वाळू चोरी होते. त्याचबरोबर टॅक्टरसारख्या वाहनात वाळू वाहतुक होते. ती ही सकाळी साडे आठ वाजेपर्यंत केली जाते. मात्र याकडे पोलीसांच्या वाहतुक शाखाकडून जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जाते. यामुळे चंद्रभागेतील वाळु उपसा करणाºयांना बळकटी मिळते. ते अधिक जोमाने वाळू उपसा करतात. यामुळे चंद्रभागा नदी पात्रातील वाळवंटात अनेक मोठे खड्डे पडले आहेत. त्या खड्यात पाणी आले की, भाविकांचा जीव धोक्यात पडण्याची शक्यता असते. यामुळे कार्तिकीच्या पार्श्वभुमीवर पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून चंद्रभागेच्या पात्रात व वाळवंटात पडलेले खड्डे जे.सी.बी.च्या साहाय्याने बुजविण्याचे काम सुरू आहे.
वाळूचोरीला लगाम घातला गेला असल्याचा महसूल प्रशासनाचा दावा असला तरी चंद्रभागेतून होत असलेल्या वाळू चोरीमुळे प्रशासनाचा हा दावा फोल ठरला आहे. नदी पात्रातून दररोज रात्रंदिवस गाढवावरून वाळू वाहतूक करून ती शहरातील बांधकामासाठी विकली जात आहे. वाळू चोरीतून बक्कळ पैसा मिळत आहे. यातील काही ‘टक्के’ पोलीस व महसुल प्रशासनालाही मिळत असल्याने त्या दोन्ही विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरीकातून बोलले जात आहे. पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या जीवावर वाळु चोरी बेतणारी असल्याने दोन्ही विभागाने चंद्रभागा वाळवंटातील वाळू चोरी बंद करण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान, " वाळु चोरी करताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल," असे वाहतूक शाखेचे पोलीस नीलेश गोपाळचावडीकर यांनी सांगितले. तर " चंद्रभागा वाळवंटात वाळु चोरीमुळे झालेले खड्डे दोन जे.सी.बी. व टॅक्टर च्या साहाय्याने बुजविण्याचे काम सुरु आहे," अशी माहिती पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सांगितले.