शासकीय अधिकाऱ्यांच्या पथकावर वाळू माफियांचा हल्ला
By admin | Published: February 21, 2016 07:45 PM2016-02-21T19:45:00+5:302016-02-21T19:45:00+5:30
वाळूच्या तस्करीविरोधात कारवाई करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केला.
Next
ऑनलाइन लोकमत
सिल्लोड, दि. २१ - वाळूच्या तस्करीविरोधात कारवाई करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केला. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात धानोरा गावालगत ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे.
पूर्णा नदीच्या पात्रामध्ये वाळू माफियांनी येथील तहसील कार्यालयाच्या पथकावर आज सकाळी हल्ला केला. वाळू उपसा प्रकरणी कारवाई करणारे मोढा बुद्रुक येथील तलाठी महेंद्र भडके यांना माफियांनी बेदम मारहाण केली आहे.
जखमी भडके यांना सिल्लोडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर हल्लेखोरांनी तहसीलदारांची गाडीदेखील फोडली आहे.
यासंबंधी सिल्लोडच्या ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कृष्णा काकडे, अंकुश काकडे, संदीप काकडे, तुळशीराम काकडे, अर्जुन काकडे, भानुदास काकडे या सहा जणांना अटक केली आहे. गावात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे