वाळू उपशाने नद्यांची ‘इको सीस्टिम’च धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 03:46 AM2020-12-19T03:46:27+5:302020-12-19T03:47:05+5:30

नदीकाठच्या संस्कृतीला वाळू तस्करांचे नख, पर्यावरणाच्या नैसर्गिक संतुलनावर अत्यंत प्रतिकूल परिणाम

Sand subsidence threatens river ecosystems | वाळू उपशाने नद्यांची ‘इको सीस्टिम’च धोक्यात

वाळू उपशाने नद्यांची ‘इको सीस्टिम’च धोक्यात

Next

नदीकाठावर संस्कृती वसते, असे इतिहास सांगतो, पण राज्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पात्रातून सुरू बेलगाम वाळू उपशामुळे नदी व पर्यावरणाच्या नैसर्गिक संतुलनावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे भीषण वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये उघड झाले आहे. नदीचे पात्र रुंद व खोल होणे, काही ठिकाणी नैसर्गिक पात्र व प्रवाहच बदलणे, कृत्रिम पुरामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन खरवडून निघणे, जलजन्य वनस्पती, कीटक, जलचर प्राण्यांची अंडी नष्ट होणे अशी कधीही भरून न निघणारी हानी होत असल्याचे राज्यातील पर्यावरण तज्ज्ञांनी नमूद केले. ‘लोकमत’च्या ठिकठिकाणच्या चमूंनी नोंदवलेल्या गंभीर बाबी अशा..... 

विदर्भ
चंद्रपूर  : वर्धा, वैनगंगा, इरई, उमा, शिरणा नद्यांचे नैसर्गिक पात्रच बदलले आहे. कृत्रिम पुरामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन खरवडून निघाली आहे.  
वाशीम : पैनगंगा नदीचे पात्र १० ते १५ फूट खाेल गेले आहे. दाेन वर्षांपूर्वी दिग्रस बु गावाजवळील काेल्हापुरी बंधारा फुटून नुकसान झाले हाेते.
नागपूर : तस्करांनी कन्हान नदीला लक्ष्य केल्यामुळे पात्रात खड्डे तयार झाले. माती खाेदकामामुळे प्रवाह बदलण्याची शक्यता बळावली आहे. 
गडचिरोली : जिल्ह्यात ५०० हेक्टर शेतजमिनीच्या हानीचा अंदाज आहे. 
अमरावती जिल्ह्यात दरड कोसळणे, जमीन खरडणे, खचणे, शेतजमीन वाहून गेल्यासंबंधी ७३६.४६ हेक्टर क्षेत्रात नुकसानाची नोंद झाली आहे. 
गोंदियात नदीपात्र रुंद झाल्याने ३० गावातील शेतकऱ्यांना फटका बसला.

मराठवाडा
नांदेड : वाजेगाव, वांगी, नागापूर, राहेर, मेळगाव परिसरात गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. बीड जिल्ह्यातील गोदावरी, सिंदफणा, मांजरा नद्यांमध्ये खड्डे पडले. औरंगाबादच्या फुलंब्रीतील गिरजा नदीतील उपशामुळे दोनदा महापूर आला.

उत्तर महाराष्ट्र
धुळे जिल्ह्यात तापी, पांझरा, बुराई या प्रमुख नद्यांच्या पात्रातील खड्ड्यांत बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या. जळगावच्या गिरणा नदीपात्राचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीपात्रात खोल खड्डे पडलेत.

पश्चिम महाराष्ट्र
पुणे जिल्ह्यात दौंड, पुरंदर, शिरूर, खेड, आंबेगाव तालुक्यात यांत्रिक बोटींच्या साहाय्याने वाळू उपसा होतो. नद्यांमधील जलचर प्राणी धोक्यात आले आहेत. मावळ तालुक्यातील नदीकाठच्या जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम झाला आहे. नदीचे पात्र विस्तीर्ण झाल्यामुळे पाणी शेतात घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. भूजल पातळीतही घट होत चालली आहे. याचा परिणाम मासेमारीवर झाल्याचे दिसत आहे. सातारा जिल्ह्यात कृष्णा, कोयना, माणगंगा, येरळा, नीरा प्रमुख नद्या, तसेच त्यांच्या उपनद्या, ओढे मोठ्या प्रमाणावर आहे. नदीपात्रालगतची सुपीक माती ओरबाडल्याने ठिकठिकाणी नद्यांचे पात्र बदललेली आहे. 

Web Title: Sand subsidence threatens river ecosystems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.