संदीप देशपांडे आणि संतोष धुरींना न्यायालयीन कोठडी
By admin | Published: October 8, 2016 10:44 PM2016-10-08T22:44:08+5:302016-10-08T23:00:18+5:30
मनपातील अधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी मनसे गटनेते संदीप देशपांडे आणि नगरसेवक संतोष धुरी यांना 10 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - मनपातील अधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी मनसे गटनेते संदीप देशपांडे आणि नगरसेवक संतोष धुरी यांना 10 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पालिकेच्या अभियंत्यांना धमकवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी स्वतःहून दादरच्या शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केलं होतं.
पोलिसांनी दिलेला जामीन नाकारल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरींना कोर्टात हजर करण्यात आलं. न्यायालयाने दोघांनाही 10 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यादरम्यान शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीदेखील केली.
राज ठाकरे यांच्या निवासस्थानी देशपांडे व धुरी असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिसांसह पोलिसांचा ताफाच गाडी घेऊन अटक करण्यासाठी पोहोचला होता. परंतु त्यांच्या हातावर तुरी देऊन देशपांडे व धुरी पसार झाले आणि पोलिसांना हात हलवत परतावे लागले होते.
Mumbai: MNS workers protest over FIR against two of its corporators by BMC engineer at Shivaji park police station pic.twitter.com/sA635moT4E
— ANI (@ANI_news) October 8, 2016