सॅण्डहर्स्ट रोड स्थानक होणार इतिहासजमा

By Admin | Published: January 20, 2017 06:33 AM2017-01-20T06:33:22+5:302017-01-20T06:33:22+5:30

मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला असा पाचवा-सहावा मार्ग बनवणार आहे.

Sandhurst Road Station | सॅण्डहर्स्ट रोड स्थानक होणार इतिहासजमा

सॅण्डहर्स्ट रोड स्थानक होणार इतिहासजमा

googlenewsNext

सुशांत मोरे,

मुंबई- मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला असा पाचवा-सहावा मार्ग बनवणार आहे. त्यासाठी रेल्वेला अनेक बदल करावे लागणार असून, ऐतिहासिक वास्तूंवरच हातोडा चालवावा लागेल. हे मार्ग बनवताना हार्बर मार्गावरील ब्रिटिशकालिन सॅण्डहर्स्ट रोड स्थानकही जमीनदोस्त केले जाणार आहे. नवे सॅण्डहर्स्ट रोड स्थानक पी. डिमेलो रोडच्या दिशेला उभारले जाईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या बदलामुळे हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडण्याची शक्यता आहे.
सीएसटी ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गाला रेल्वे बोर्डाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठीचा खर्च, आरेखन इत्यादीवर अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. पाचव्या-सहाव्या मार्गासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने दादर स्थानकात पश्चिमेला दोन नवीन प्लॅटफॉर्म, सायन, करी रोड, चिंचपोकळीसह भायखळा स्थानकातील रचनेतही बदल केले जातील. हार्बरवर कुर्ल्यापासून सीएसटीपर्यंतही बदल होतील.
हार्बर मार्ग कुर्ला, डॉकयार्ड रोड येथून पी.डिमेलो रोडमार्गे वळवला जाणार आहे. मेन लाइनवरील सॅण्डहर्स्ट रोड स्थानक मात्र उपलब्ध केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सॅण्डहर्स्ट रोड स्थानक
पी. डिमेलो रोडमार्गे नेतानाच तेथून मशीद स्थानकाला जोडण्यासंबंधीही मध्य रेल्वेकडून नियोजन केले जात आहे. यावर अंतिम निर्णय होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. पाचवा-सहावा मार्ग उपलब्ध करण्यासाठी कुर्ला स्थानकातील हार्बर मार्ग एलिव्हेटेड (उन्नत) केला जाणार आहे आणि त्याखालून पाचव्या-सहाव्या मार्गासाठी जागा उपलब्ध केली जाईल. मात्र कुर्ला येथून हार्बरच्या मार्गात बदल करतानाच तो डॉकयार्ड, सॅण्डहर्स्ट रोड व सीएसटीपर्यंत बदल करण्यात येईल.
>विल्यम मॅन्सफिल्ड
फर्स्ट विस्काउंट सॅण्डहर्स्ट यांच्या नावाने या स्थानकाचे नाव ठेवले आहे. १८९५ ते १९०० या काळात ते मुंबईचे गव्हर्नर होते. हे स्थानक १९२१ साली बांधण्यात आले.

Web Title: Sandhurst Road Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.