Sandip Deshpande Spotted Video: राज ठाकरेंच्या घराबाहेरून गायब झाले, आज तिथेच प्रकटले; संदीप देशपांडे शिवतीर्थवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 12:07 PM2022-05-20T12:07:19+5:302022-05-20T12:07:51+5:30
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. दर महिन्याच्या १ आणि २३ तारखेला पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याची अट यामध्ये घालण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांच्या तावडीतून सुटून पलायन करणाऱ्या मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींना मुंबई सत्र न्यायालयाने शुक्रवारी जामिन मंजूर केला होता. यामुळे गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता असलेले देशपांडे आज जिथून पसार झालेले तिथेच प्रकटले आहेत.
राज ठाकरेंनी ४ मे पासून भोंग्यांवरून हनुमान चालिसा लावण्याबाबत दिलेला अल्टीमेटम संपला होता. यामुळे पोलिसांनी मनसे नेत्यांनी धरपकड सुरु केली होती. यात मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे ठाकरेंच्या बंगल्याबाहेर आले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतू त्यांनी पोलिसांना झटका देऊन कारमध्ये बसून पलायन केले होते. या साऱ्या गदारोळात महिला पोलीस अधिकारी रस्त्यावर आदळली होती. यामुळे पोलिसांनी या दोघांविरोधात ३५३ कलमाद्वारे गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून देशपांडे भूमीगत झाले होते.
देशपांडे यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. परंतू त्यांना देशपांडेंचा ठावठिकाणा लागला नव्हता. देशपांडेच्या कारच्या चालकाला अटक करण्यात आली होती. परंतू ते देखील देशपांडे कुठे आहेत ते सांगू शकला नाही. जामिन मंजूर होताच देशपांडे राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थबाहेर हजर झाले. त्यांच्यानंतर मनसेचे आणखी एक नेते बाळा नांदगावकर राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत.
जामीन मंजूर झाल्यानंतर संदीप देशपांडे राज ठाकरे यांच्या भेटीला.#RajThackeray#SandipDeshpande#MNShttps://t.co/JkFetXvxHCpic.twitter.com/s85cOlNMfd
— Lokmat (@lokmat) May 20, 2022
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. दर महिन्याच्या १ आणि २३ तारखेला पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याची अट यामध्ये घालण्यात आली आहे. त्यांच्या चालकाला देखील जामिन देण्यात आला आहे.