जमीन घोटाळ्याविरोधात संदीप राऊत यांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:39 PM2018-03-29T14:39:59+5:302018-03-29T14:39:59+5:30
ग्रामपंचायतीला ग्रामसेवक निवासी रहाण्यासाठी बायोमेट्रिक मशीन बसवण्यात यावी.
मोखाडा : तालुक्यात बनावट जमीन खरेदी विक्रीचे दस्तऐवज बनवून अनेक जमिनीची खरेदी विक्री झालेली आहे या जमीन घोटाळे खोरांवर कडक कारवाई करण्यात यावी वाघ प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला मिळावा. ग्रामपंचायतीला ग्रामसेवक निवासी रहाण्यासाठी बायोमेट्रिक मशीन बसवण्यात यावी. गभलपाडा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी या मागणींसाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप राऊत सोमवारपासून मोखाडा तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले आहेत मोखाडा तालुक्यात अनेक बोगस जमीन खरेदी विक्री व्यवहार झाले आहेत परंतु महसूल विभागाच्या मेहरबानीमुळे कारवाई केली जात नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संदीप राऊत यांना उपोषणाचे हत्यार उपसावे लागले असून चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच असूनही महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.