शेतकरी हवालदिल होऊन म्हणाला; ...त्यापेक्षा ढबू मिरची फुकटच घ्या, ग्राहकांनी खरंच नेली हो!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 11:30 AM2021-08-23T11:30:35+5:302021-08-23T11:31:10+5:30

Farmer sale Shimla Mirchi for free beacause of low rate ढबू मिरची बाजारपेठेत आणू नका, असे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. आता या मिरचीचे काय करायचे म्हणून त्यांनी चक्क वाटून टाकली.

Sangali Farmer says take Shimla Mirchi for free, customers have really taken it! | शेतकरी हवालदिल होऊन म्हणाला; ...त्यापेक्षा ढबू मिरची फुकटच घ्या, ग्राहकांनी खरंच नेली हो!

शेतकरी हवालदिल होऊन म्हणाला; ...त्यापेक्षा ढबू मिरची फुकटच घ्या, ग्राहकांनी खरंच नेली हो!

Next

अशुतोष कस्तुरे, लोकमत न्यूज नेटवर्क

पलूस, (जि. सांगली) : बाजारात पडेल भावाने भाजीपाला मागणाऱ्याला 'तेवढं तरी कशाला देतोस, फुकटच घेऊन जा' असं शेतकरी कधी कधी त्राग्याने म्हणतो. पण एका शेतकऱ्याचा हा त्रागा इतका विकोपाला जाईल, असे कोणाला वाटले नव्हते. ढबू मिरचीचे दर गडगडल्याने हवालदिल बनलेल्या शेतकऱ्याने चक्क ट्रॉलीभर ढबू मिरची फुकट वाटली. पण, अशा स्थितीतही त्या शेतकऱ्याला चार पैसे देण्याची भावना कोणालाही झाली नाही. (Farmer sale Shimla Mirchi for free beacause of low rate in Market/)

कुंभारगाव (ता. कडेगाव) हे गाव 'भाजीपाल्याचे माहेरघर' म्हटले जाते. कुंडलपासून दोन किलोमीटरवरील कुंभारगाव (ता. कडेगाव) येथील भीमराव साळुंखे हे दरवर्षी २५ गुंठे क्षेत्रात ढबू मिरची लागवड करतात. ही मिरची ते मुंबई, पुणे येथे पाठवतात. खर्च वजा जाता तीन ते चार महिन्यांत त्यांना लाखाचा तरी फायदा होतच होता. यंदा ढोबळी मिरचीचे पीक चांगले आले पण, बाजारपेठेत किलोला पाच रुपये सुद्धा दर मिळेना. ढबू मिरची बाजारपेठेत आणू नका, असे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. आता या मिरचीचे काय करायचे म्हणून त्यांनी चक्क वाटून टाकली.

अशीच परिस्थिती राहिली, तर शेतकरी देशोधडीला लागेल. शेतकऱ्याला मदतीची नाही, तर पिकविलेल्या मालाला योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे.
- भीमराव साळुंखे, शेतकरी,

Web Title: Sangali Farmer says take Shimla Mirchi for free, customers have really taken it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.