सांग दर्पणा.. कसा मी दिसतो ?

By admin | Published: November 6, 2014 08:47 PM2014-11-06T20:47:10+5:302014-11-06T22:01:16+5:30

तरुणींना मर्यादा : मोबाईल, गाडीची काच, संगणक यातील आरसा म्हणून काहीही चालते

Sange Duryata .. How do I see? | सांग दर्पणा.. कसा मी दिसतो ?

सांग दर्पणा.. कसा मी दिसतो ?

Next

प्रगती जाधव-पाटील - सातारा
महिला आणि दर्पणाचे खूप जवळचे आणि घट्ट नाते आहे. स्वत:चे सौंदर्य न्याहळण्यासाठी तरुणी सर्वाधिक दर्पणाचा वापर करतात, असा सार्वत्रिक समज आहे. मात्र, तरुणींपेक्षाही अधिक वेळ दर्पण दिसेल तिथे स्वत:ला न्याहळत बसण्याचा पहिला मान तरुणांकडे जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पूर्वी अंघोळीनंतर आवरताना एकदाच आरशात स्वत:चा चेहरा बघणारा तरुण आता बदलला आहे. आता सकाळी बेडमधून बाहेर पडतानाच मोबाईलचा आरसा करून तरुणांच्या दिवसाची सुरुवात होते. सकाळचे आवरून बाहेर पडेपर्यंत घरात सर्वांचा ओरडा खाऊनही ही मुलं सुधारत नाहीत.
महिला आणि दर्पण याचे नाते साहित्यातही पाहायला मिळते. यावर अनेक कविता आणि चित्रपटांतून अनेक गाणीही प्रसिद्ध आहेत. पण, आता आरशाचे नाते अधिक व्यापक होत ते तरुणांपर्यंतही पोहोचलेले आहे. आपले सौंदर्य खुलविण्यासाठी तासन्तास आरशासमोर बसलेल्या तरुणांवर भविष्यात कवी मनातील कल्पना उमगली तर नवल याचे वाटायला नको.

हे आहेत तरुणांचे आरसे...!
गाडीचा आरसा
चारचाकीची खिडकीची काच
मोबाईल स्क्रिन
दुकानाचे काचेचे दार
मित्राचा गॉगल
मोबाईलचा फ्रंट कॅमेरा
बंद असलेला टीव्ही किंवा कॉम्प्युटर स्क्रीनव्यायामशाळेतील आरसे

काय करतात
आरशात बघून...
केस सावरणे
चेहऱ्यावरील धूळ पुसणे
मिशीची सेटिंग नीट करणे
इन शर्ट, आउट शर्ट पॅटर्न
बघणे
आपला अपिअरन्स
तपासणे

का बघतात आरशात
हेअरस्टाईल ठिकठाक असावी म्हणून
आपल्या लूकमध्ये कुठेही गबाळेपणा दिसू नये म्हणून
हेअरस्टाईल नीट कॅरी करता यावी म्हणून
रस्त्यावर कोणाची तरी वाट बघताना मिळालेल्या वेळेचा सदुपयोग
स्वच्छ प्रकाशात चेहऱ्यावरील बदल दिसावेत म्हणून.
व्हॉट्स अ‍ॅपवर आपल्या बॉडीची छबी इतरांना दाखविण्यासाठी काहीजण आरशाचा वापर करतात.

तरुणींच्या दर्पणाला मर्यादा
घरातून बाहेर पडताना आवरलेलं पुन्हा पाहायचं असेल किंवा त्यात काही नीटकेपणा करायचा असेल, तर तरुणी अजूनही बंदिस्त ठिकाणी जाणे पसंत करतात. त्यामुळे मुलींच्या दर्पणाला मर्यादा आहेत.
या उलट तरुण रस्त्यावर कुठेही आरशात बघून स्वत:ला आवरू शकतात. कुठला शर्ट इन केल्यावर चांगला दिसतो आणि कुठला आऊट केल्यावर मस्त वाटतो, याची चर्चाही मुलं चौकात उभे राहून डेमो करून दाखवू शकतात
पण आजही कपाळावरची टिकली नीट करायची असेल, तर आडोसा असलेल्या ठिकाणी जाऊन ती व्यवस्थित करण्याकडे तरुणींचा कल असतो.
कपड्यांमध्ये मुलींना जशी खूप व्हरायटी आहे, तशीच लूक बदलण्यासाठी मुलांना चांगला वाव आहे. दाढी, मिशी, केश रचना यातील किरकोळ बदल केले तरीही त्यांचा लूक बदलतो. बदललेला लूक कायम ठेवण्यासाठी सजग राहावे लागते. म्हणूनच तरुणींच्या तुलनेत तरुण आरशासमोर अधिक वेळ खोळंबलेले दिसतात.
- चंदन पवार,
मेन्स् पार्लर चालक

सर्वांनाच असे वाटते की, मुली सर्वाधिक वेळ आरशासमोर घालवितात. वास्तविक तरुण सर्वाधिक वेळ आरशासमोर असतात. दर पंधरा-वीस दिवसांला आपली स्टाईल बदलणारे तरुण घर, रस्ता, दुकान असे कुठेही स्वत:ला आरशात न्याहळत बसतात.
- संयोगिता घाटग


बऱ्याचदा आमची हेअर स्टाईल गाडीवरच्या प्रवासाने विसकटण्याची भीती असते. केलेली हेअर स्टाईल वाऱ्याने बदलली तर लूक खूप घाण दिसतो. म्हणून गाडीवरून उतरल्या-उतरल्या आम्ही आरशात बघून केस नीट करतो. तरुणी तोंडाला स्कार्फ बांधत असल्यामुळे त्यांना त्यासाठी विशेष काही करावे लागत नाही..
- सयाजी कदम,
सातारा

Web Title: Sange Duryata .. How do I see?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.