संगीत देवबाभळी ने पटकावले प्रथम पारितोषिक, ३० व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे निकाल घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 05:10 PM2018-05-02T17:10:07+5:302018-05-02T17:10:07+5:30

३० व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन, मुंबई या संस्थेच्या संगीत देवबाभळी या नाटकासाठी रु. ७लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली.

Sangeet Devbabali won the first prize | संगीत देवबाभळी ने पटकावले प्रथम पारितोषिक, ३० व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे निकाल घोषित

संगीत देवबाभळी ने पटकावले प्रथम पारितोषिक, ३० व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे निकाल घोषित

मुंबई -  ३० व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन, मुंबई या संस्थेच्या संगीत देवबाभळी या नाटकासाठी रु. लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे-

सुधीर भट थिएटर्स, मुंबई या संस्थेच्या अनन्या या नाटकास रु.  लाख ५० हजाराचे व्दितीय पारितोषिक आणि त्रिकुट, मुंबई या संस्थेच्या वेलकम जिंदगी या नाटकास रु.  लाखाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. अन्य निकाल पुढीलप्रमाणे:-

दिग्दर्शन :- प्रथम पारितोषिक (रु.१,५०,०००/-) प्रताप फड (नाटक-अनन्या)

          व्दितीय पारितोषिक (रु.१,००,०००/-) प्राजक्त देशमुख (नाटक-संगीत देवबाभळी)

          तृतीय पारितोषिक (रु. ५०,०००/-) स्वप्नील बारस्कर (नाटक-अशीही श्यामची आई)

नाट्यलेखन : प्रथम पारितोषिक (रु. १,००,०००/-) प्राजक्त देशमुख (नाटक-संगीत देवबाभळी)

          व्दितीय पारितोषिक (रु.६०,०००/-) अजित दळवी (नाटक-समाजस्वास्थ)

          तृतीय पारितोषिक (रु.४०,०००/-) चैतन्य सरदेशपांडे (नाटक-माकड)

प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) प्रफुल्ल दिक्षित (नाटक-संगीत देवबाभळी)

           व्दितीय पारितोषिक (रु.३०,०००/-) भूषण देसाई (नाटक-अनन्या)

           तृतीय पारितोषिक (रु.२०,०००/-) राजन ताम्हाणे (नाटक-वेलकम जिंदगी)

नेपथ्य : प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) संदेश बेंद्रे (नाटक-अनन्या)

           व्दितीय पारितोषिक (रु.३०,०००/-) प्रदिप मुळे (नाटक-संगीत देवबाभळी)

           तृतीय पारितोषिक (रु.२०,०००/-) प्रसाद वालावलकर (नाटक-अशीही श्यामची आई)

संगीत दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) आनंद ओक (नाटक-संगीत देवबाभळी)

           व्दितीय पारितोषिक (रु.३०,०००/-) समीर साप्तीकर (नाटक-अनन्या)

           तृतीय पारितोषिक (रु.२०,०००/-) अभिजित पेंढारकर (नाटक-अशीही श्यामची आई)

वेशभूषा : प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) महेश शेरला (नाटक-संगीत देवबाभळी)

         व्दितीय पारितोषिक (रु.३०,०००/-) माधुरी पुरंदरे (नाटक-समाजस्वास्थ)

         तृतीय पारितोषिक (रु.२०,०००/-) चैताली डोंगरे (नाटक-वेलकम जिंदगी)

रंगभूषा : प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) सचिन वारीक (नाटक-संगीत देवबाभळी)

       व्दितीय पारितोषिक (रु.३०,०००/-) शरद सावंत व सागर सावंत (नाटक-वेलकम जिंदगी)

        तृतीय पारितोषिक (रु.२०,०००/-) संदीप नगरकर (नाटक-अशीही श्यामची आई)

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व रु.५०,०००/-

पुरुष कलाकार : राहुल शिरसाट (नाटक-माकड), सिध्दार्थ बोडके (नाटक-अनन्या), अतुल पेठे (नाटक-समाजस्वास्थ), मकरंद अनासपुरे (नाटक-उलट सुलट), भरत जाधव (नाटक-वेलकम जिंदगी)

स्त्री कलाकार : सोनाली मगर (नाटक-माकड), शुभांगी सदावर्ते (नाटक-संगीत देवबाभळी), अतिशा नाईक (नाटक-अशीही श्यामची आई), ऋतुजा बागवे (नाटक-अनन्या), शिवानी रांगोळे (नाटक-वेलकम जिंदगी)

 ९ ते १७ एप्रिल २०१८ या कालावधीत रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी आणि प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरीवली या ठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १० व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. श्याम भूतकर, श्री. वामन तावडे, डॉ. अनिल बांदिवडेकर, श्री. जयंत पवार आणि श्रीमती शकुंतला नरे यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Sangeet Devbabali won the first prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.