संघ स्वयंसेवकांना दसऱ्याला फुलपॅन्ट नक्की!

By Admin | Published: August 21, 2016 01:28 AM2016-08-21T01:28:08+5:302016-08-21T01:28:08+5:30

दसऱ्याला होणाऱ्या संचलनासाठी संघ स्वयंसेवकांना फुलपॅन्ट देण्याचा मुक्रर झालेला मुहूर्त साधण्यासाठी लगीनघाई सुरू आहे. नवा गणवेश कसा असेल याबाबत स्वयंसेवकांची प्रतीक्षा

Sangh Swayamsevaks have absolutely the fullpaint! | संघ स्वयंसेवकांना दसऱ्याला फुलपॅन्ट नक्की!

संघ स्वयंसेवकांना दसऱ्याला फुलपॅन्ट नक्की!

googlenewsNext

- योगेश पांडे, नागपूर

दसऱ्याला होणाऱ्या संचलनासाठी संघ स्वयंसेवकांना फुलपॅन्ट देण्याचा मुक्रर झालेला मुहूर्त साधण्यासाठी लगीनघाई सुरू आहे. नवा गणवेश कसा असेल याबाबत स्वयंसेवकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. या आठवड्यात संघाचा नवा गणवेश संघ मुख्यालयात पोहोचणार आहे. नागपूर महानगरातील स्वयंसेवकांची संख्या लक्षात घेता गणवेशांची संख्या अपुरी पडणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन आता स्थानिक पातळीवरही गणवेश बनविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बदलत्या काळाप्रमाणे संघाच्या गणवेशातदेखील बदल झाले पाहिजेत, असा मतप्रवाह होता. संघाने बऱ्याच विचाराअंती गणवेशामध्ये बदल केला. मार्चमध्ये राजस्थान येथील नागौर येथे झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेदरम्यान संघातर्फे याची घोषणा करण्यात आली होती. गणवेशातील खाकी ‘हाफपॅन्ट’च्या ऐवजी तपकिरी रंगाच्या ‘फुलपॅन्ट’चा समावेश करण्यात आला. नव्या गणवेशासाठी विजयादशमीचा मुहूर्तदेखील ठरविण्यात आला. नागपुरातील रेशीमबाग मैदानात होणाऱ्या या कार्यक्रमापासून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यापासून स्वयंसेवक नव्या गणवेशात दिसतील.
नवा गणवेश सुरुवातीला संघाकडून तयार करण्यात येईल व केंद्रिभूत पद्धतीने त्याचे वाटप करण्यात येईल, असे ठरले होते. त्यानुसार राजस्थानमधील भिलवाडा येथे ‘टेलर्स’ची ‘टीम’च कामाला लागली होती. नवे गणवेश संघ मुख्यालयात कधी दाखल होतील याबाबत स्वयंसेवकांमध्ये उत्सुकता होती. काही दिवसांअगोदरच तयार झालेले गणवेश राजस्थानमधून दिल्लीत पोहोचले आहेत. दिल्लीहून देशभरात गणवेश पाठविण्यात येणार आहेत. मुख्यालयात हे गणवेश आॅगस्टच्या अखेरच्या आठवड्यापासून उपलब्ध होतील.

Web Title: Sangh Swayamsevaks have absolutely the fullpaint!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.