सांगली जिल्ह्यात ७१%मतदान
By Admin | Published: February 22, 2017 01:10 AM2017-02-22T01:10:39+5:302017-02-22T01:10:39+5:30
महिलांचा टक्का वाढला : ५९० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद; खेडमध्ये महिलेचा मृत्यू
सांगली : जिल्हा परिषदेच्या ६० जागांसाठी २२५, तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ३६७ अशा ५९० उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंद झाले. जिल्ह्यात जतमध्ये सहा ठिकाणी मारामारी झाली, तर मिरज तालुक्यातील हरिपूर, तुंग येथे आणि तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी, जरंडीत वादावादी झाली. खेड (ता. शिराळा) येथे मतदानास येताना एका महिलेचा मृत्यू झाला. सरासरी ७१.२४ टक्के मतदान झाले. गुरुवार, दि. २३ रोजी मतमोजणी होणार आहे.
जिल्ह्यात पंचायत समितीच्या दोन जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. मंगळवारी १६ लाख ३ हजार १४७ पैकी ११ लाख ४२ हजार १०२ मतदारांनी १ हजार ८२४ मतदान केंद्रांवर मतदान केले. याची टक्केवारी ७१.२४ टक्के आहे. सकाळच्या पहिल्या दोन तासात संथगतीने नऊ टक्के मतदान झाले होते. साडेनऊनंतर मतदानासाठी गर्दी होऊ लागली. दुपारी दीडपर्यंत ३८.२८, तर दुपारी साडेतीनपर्यंत ५३.४९ टक्के मतदान झाले. चारनंतर मतदानासाठी रांगा लागल्याने कडेगाव, पलूस, वाळवा, मिरज, जत, तासगाव तालुक्यात वेळ संपल्यानंतरही मतदान झाले. पलूसमध्ये सर्वाधिक ८०.८३ टक्के, तर वाळवा तालुक्यात ६७.४६ सर्वात (पान ९ वर)
जतमध्ये सहा ठिकाणी मारामारी
तुंग, डोंगरसोनी, हरिपूर, जरंडीत वादावादी
कवठेपिरान, दुधोंडीत मतदान यंत्रात बिघाड
सांगली जिल्ह्यात मंगळवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी चुरशीने मतदान झाले. इनाम धामणी येथील शेतकरी कुटुंबाने बैलगाडीतून येऊन मतदानाचा हक्क बजावला.