पाकिस्तानच्या गोळीबारात सांगलीचा जवान शहीद
By admin | Published: October 29, 2016 11:48 AM2016-10-29T11:48:00+5:302016-10-29T12:39:37+5:30
पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आलं आहे. जम्मूच्या कुपवाड्यातील माछिल सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात सांगलीचे नितीन सुभाष कोळी शहीद झाले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 29 - पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आलं आहे. जम्मूच्या कुपवाड्यातील माछिल सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात सांगलीचे नितीन सुभाष कोळी शहीद झाले आहेत. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात असून रात्री करण्यात आलेल्या गोळीबारात कॉन्स्टेबल नितीन सुभाष कोळी जखमी झाले होते. मात्र आज त्यांना वीरमरण आलं. नितीन सुभाष कोळी यांच्यासोबतच शिख रेजिमेंटचे मनदीप सिंह देखील शहीद झाले आहेत.
नितीन कोळी मुळचे सांगलीचे आहेत. सांगलीतील कुपवाडचे असणारे नितीन कोळी 2008 साली बीएसएफमध्ये रुजू झाले होते. माछिल सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालत असताना बीएसएफ जवानांच्या पथकावर दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात मनजित सिंह आणि नितीन कोळी यांना वीरमरण आलं.
नितीन सुभाष कोळी यांच्याबद्दल माहिती -
- शहीद नितीन सुभाष कोळी (वय ३०) यांचे मूळगाव मिरज तालुक्यातील दुधगाव असून आई-वडील मजुरी करतात.
- नितीन कोळी २००८ मध्ये सीमा सुरक्षा दलात भरती झाले
- नितीन यांचा विवाह २०१० मध्ये झाला असून त्यांना दोन मुले आहेत.
- नितीन यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, लहान भाऊ आणि मुलगा असा परिवार आहे.
Nitin Subhash was firing a long range weapon;Unfortunately round blasted in chamber itself giving a recoil: BSF IG (Kashmir) Vikash Chandra pic.twitter.com/3SXAxrZ0gq
— ANI (@ANI_news) October 29, 2016
एकीकडे संपूर्ण देश दिवाळी साजरी करत असताना दुसरीकडे सीमारेषेवरील जवान मात्र शत्रूशी दोन हात करत जीवाची बाजी देऊन लढत आहेत. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानने तब्बल 53 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.
(In pic): Constable Nitin Subhash of BSF lost his life in Machil sector while retaliating to the ceasefire violations by Pakistan. pic.twitter.com/d4iHBnZmib
— ANI (@ANI_news) October 29, 2016
जम्मू काश्मीरमधील कठुआ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून तोफमारा करत शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी पाकिस्तानने हल्ला करण्यास सुरुवात केली. बीएसएफने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सीमारेषेवरील तणाव लक्षात घेता सीआरपीएफने काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवली असून चेक पॉईंट्सही वाढवली आहेत.