मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 10:28 AM2024-05-02T10:28:29+5:302024-05-02T10:29:25+5:30
Sangli loksabha Election - सांगली इथं मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत आले होते, त्यावेळी निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीवरून राऊतांनी निवडणूक आयोगावर शंका उपस्थित केली.
सांगली - Sanjay Raut on BJP ( Marathi News ) पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर ११ दिवसांनी, दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर ३ दिवसांनी आकडेवारी दिली आहे. तिथल्या सर्व मतदारसंघात अचानक ५-६ टक्के मतदानात वाढ झाल्याचं निवडणूक आयोगाच्या आकडेवारीत आलंय. नांदेडला मतदान संपताना ५२ टक्के मतदान होते, तिथे ६२ टक्के मतदान कसे झाले?, निवडणूक आयोगानं मतदानाच्या टक्केवारीचे आकडे जाहीर केले ते धक्कादायक, ११ दिवस मतदान टक्केवारी जाहीर करायला कसे लागतात अशी शंका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केली आहे.
सांगलीत पत्रकारांशी संजय राऊतांनी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की, डिजिटल इंडियात संध्याकाळपर्यंत किती मतदान झाले याचे आकडे आम्हाला समजत होते, पण आश्चर्य असे फक्त नागपूर मतदारसंघात अर्धा टक्के मतदान कमी दाखवलं आहे. नागपूर सोडून सगळीकडे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालीय. ही वाढ अचानक कशी झाली, हे वाढलेले मतदान कुणी केले, कुठे गेले, ११ दिवस का लागले. हा प्रश्न देशातील जनतेला प्रश्न पडलेत. भारताचा निवडणूक आयोग हा भारताचा राहिला नसून ते मोदी-शाह यांच्या हातातील बाहुले झालंय का असा सवाल त्यांनी केला.
तसेच पाकिस्तानात निवडणूक लष्कर ठरवतं, कुणाला आघाडी द्यायची, कुणाला पाठिमागे टाकायचे हे पाकिस्तानात लष्कर ठरवतं, तशाच प्रकार भारतात होत आहे. भाजपा मतदाना कमी पडला, त्यातून अचानक मतदानाची टक्केवारी वाढली आहे. ११ दिवसांत वाढलेले मतदान आले कुठून? मतपत्रिकेवर मतदान होत होते, तेव्हाही संध्याकाळी ७ पर्यंत आकडेवारी सांगितली जायची. यावेळी डिजिटल इंडिया त्यादिवशी संध्याकाळी आलेली आकडेवारी आणि त्यानंतर ११ दिवसांनी आलेली नवीन आकडेवारी यामुळे निवडणूक आयोगाने पुन्हा माती खाल्ली ही अतिशय गंभीर गोष्ट आहे असंही संजय राऊतांनी म्हटलं.
स्फोट घडवावा असं देवेंद्र फडणवीसांकडे काही नाही
देवेंद्र फडणवीसांकडे काहीही गोपनीय माहिती नाही, स्फोट करावा असं त्यांच्याकडे काही नाही. फडणवीस लवंगी फटाका इतकाच आवाज करू शकतात. उद्धव ठाकरेंवर खोटे आरोप करण्यापलीकडे ते काहीही करू शकत नाही. मोदी-शाह यांनी तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं नाही. तिथे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद देणार कसं? देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून भरकटलेल्या सारखे बोलतायेत, महाराष्ट्रात लोकसभा, राज्याची विधानसभा हरतायेत. ज्याप्रकारे राजकारण फडणवीस यांनी महाराष्ट्रात सुरू केले, त्या भयातून ते लवंगी फटाकी फोडतायेत असंही संजय राऊतांनी सांगितले.