सांगलीत स्केटिंगपटूंची मिरवणूक

By admin | Published: June 11, 2015 11:09 PM2015-06-11T23:09:05+5:302015-06-12T00:43:04+5:30

बेळगावमधील शिवगंगा क्लबमध्ये हा उपक्रम झाला. रिले पद्धतीने ग्रुपद्वारे खेळाडूंनी हा विक्रम केला

Sangliat skating procession | सांगलीत स्केटिंगपटूंची मिरवणूक

सांगलीत स्केटिंगपटूंची मिरवणूक

Next

सांगली : येथील चिमुकल्या स्केटिंगपटूंनी बेळगाव (कर्नाटक) येथे सलग १२१ तास स्केटिंग करून जिल्ह्याच्या लौकिकात भर घातली आहे. या यशस्वी खेळाडूंची सांगलीतून मिरवणूक काढण्यात आली. गणपती मंदिरपासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी उद्योजक नंदकुमार शिंदे उपस्थित होते. गणपती मंदिर, टिळक चौक, मनपा चौक, कॉलेज कॉर्नर, विश्रामबाग चौक, शंभर फुटी मार्ग, पुष्पराज चौक, राममंदिर चौक ते शिवाजी स्टेडियम असा मिरवणुकीचा मार्ग होता. विविध क्रीडा संघटना, व्यायाम मंडळे व प्रशिक्षकांनी चौका-चौकांत मिरवणुकीचे स्वागत केले. बेळगावमधील शिवगंगा क्लबमध्ये हा उपक्रम झाला. रिले पद्धतीने ग्रुपद्वारे खेळाडूंनी हा विक्रम केला. सहभागी खेळाडूंमध्ये वेदिका घडशी, मैत्रई पाटील, अखिलेश ओतारी, मैत्रई भरगुडे, श्रवण काळेल, स्वप्निल ठोंबे, पंकजसिंह देशमुख, ओम नंदगावकर आदींचा समावेश होता. मिरवणुकीत अश्विनी शिंदे, डॉ. विनायक पाटील, परवीन शिंदे, प्रदीप घडशी, रोहिणी शिंदे, अर्चना ओतारी, दीपाली काळेल, शिरीष नंदगावकर, शुभम जाधव उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Sangliat skating procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.