पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून संग्रामसिंह देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 01:55 PM2020-11-09T13:55:42+5:302020-11-09T13:57:09+5:30
elecation, punepadwidhar, politics, bjp, sangli पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्यावतीने सोमवारी सांगली जिल्ह्यातील भाजप नेते व सांगली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे भाजपच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्यावतीने सोमवारी सांगली जिल्ह्यातील भाजप नेते व सांगली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे भाजपच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
खानापूरचे दिवंगत माजी आमदार संपतराव देशमुख यांचे पूत्र संग्रामसिंह यांना यापूर्वी पलूस-कडेगाव मतदारसंघातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी पक्षीय आदेशानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेत विश्वजीत कदम यांच्या निवडीची वाट मोकळी केली होती. संग्रामसिंह देशमुख सध्या जिल्हा बँकेत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणूनही त्यांनी चांगले काम केले होते. या सर्व कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना दुसऱ्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. देशमुख समथर्कांनी उमेदवारी जाहीर होताच जल्लोष केला.
एकाच जिल्ह्यात दोघांना उमेदवारी
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादीत काट्याची लढत शक्य आहे. भाजपने सांगली जिल्ह्यातील देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही याच जिल्ह्यातील अरुण लाड यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुणे पदवीधर निवडणुकीच्या राजकारणाच सांगली जिल्हा हे केंद्र बनणार आहे.
पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आहे. पक्षाशी व जनतेशी प्रामाणिक राहून काम केल्याचे हे फळ आहे. लोकांसाठी कार्यरत राहण्यासाठी यापुढेही प्रयत्न करणार आहे. या मतदारसंघात पक्षाची ताकद अबाधित आहे. यश नक्की मिळेल.
- संग्रामसिंह देशमुख, सांगली
आमदारकीची परंपरा
दिवंगत माजी आमदार संपतराव देशमुख यांनी १९९५ मध्ये पतंगराव कदम यांचा पराभव करून आमदारकी मिळवली होती. संपतराव देशमुख यांच्या पश्चात त्यांचे पुतणे पृथ्वीराज देशमुख यांनी पतंगराव कदम यांच्याविरोधात विधानसभा पोटनिवडणूक जिंकली होती. त्यांनतर पृथ्वीराज देशमुख यांना भाजपच्या सत्ताकाळात २०१९ मध्ये विधानपरिषदेवर संधी मिळाली होती. आता आणखी एकदा उमेदवारी मिळाल्याने देशमुख समथर्कांतून आनंद व्यक्त होत आहे.