सॅनिटरी नॅपकिन्सची ‘ग्रीनडिस्पो’ने विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 04:46 AM2019-05-19T04:46:26+5:302019-05-19T04:46:33+5:30
नीरी व इतर संस्थांनी बनविली इलेक्ट्रॉनिक्स भट्टी; एका तासात ३० ते ६० पॅडचे प्रदूषणमुक्त डिस्पोजल
- निशांत वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात दर महिन्याला एक अब्ज सॅनिटरी नॅपकिन्सचा कचरा निर्माण होतो, मात्र या धोकादायक कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत असलेले अज्ञान तेवढेच उदासीन करणारे आहे. खरं तर या कचºयाचा बायोमेडिकल (जैविक) कचºयात समावेश होतो. पण त्याची विल्हेवाट सामान्य कचºयाप्रमाणे लावली जाते आणि यातून पर्यावरण आणि आरोग्याचेही धोके निर्माण झाले आहेत. यावर वर्षभराच्या परिश्रमानंतर राष्टÑीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) ‘ग्रीनडिस्पो’ ही पर्यावरणीय आणि ऊर्जा कार्यक्षम विद्युत सॅनिटरी पॅड भट्टी तयार केली आहे. ही भट्टी किफायतशीर आणि प्रदूषणमुक्त असल्याचा दावा नीरीच्या संशोधकांनी केला आहे.
महिलांचे अंदाजे ३२ प्रजोत्पादन वर्ष गृहित धरले जातात व या विशिष्ट वेळी मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना ८ ते १२ नॅपकिन्सची आवश्यकता असते. म्हणजे एक महिला एकूण सरासरी ४,५०० नॅपकिन्सचा वापर करते. भारतात महिन्याला अंदाजे १ अब्ज व वर्षाला अंदाजे १२ अब्ज नॅपकिन्सचा वापर होतो.
मासिक पाळीदरम्यान आरोग्यदायी नॅपकिन्सच्या वापराबाबत वाढलेली जागरुकता चांगले संकेत आहेत. मात्र नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्याबाबत उदासीनता दिसून येते. हा जैविक कचरा असल्याने त्यानुसार त्याची विल्हेवाट लावणे अत्यावश्यक आहे. कचºयाची अयोग्य प्रकारे विल्हेवाट लावणे अत्यंत धोकादायक असल्याचे आरोग्य संस्थेचे म्हणणे आहे. त्यातून आजार उद्भवू शकतात. त्यावर उपाय शोधण्याचे आव्हान मागील वर्षी नीरीने स्वीकारले. नीरीसह हैदराबादच्या इंटरनॅशनल अॅडव्हान्स रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटलर्जी अॅन्ड न्यू मटेरियल्स (एआरसीई) तसेच सोब्बाल एरोथेरॅमिक्सच्या संयुक्त विद्यमाने वर्षभराच्या संशोधन व यशस्वी प्रयोगानंतर ‘ग्रीनडिस्पो’ या आधुनिक विद्युत भट्टीची निर्मिती करण्यात आली आहे. या दोन्ही संस्थांनी मिळून त्याचे पेटंटही घेतले आहे.
भट्टी चेंबरमध्ये ५ ते १५ पॅड टाकून १५ मिनिटांत दहन करणे, म्हणजे तासाला ३० ते ६० पॅड दहन करण्याची क्षमता ग्रीनडिस्पोमध्ये आहे. कमी ऊर्जा वापर व अधिक तापमान वाढीवर या यंत्रात भर दिला आहे. विविध चाचण्या करून हा प्रयोग यशस्वी करण्यात आल्याचे नीरीचे संशोधक डॉ. नितीन लाभशेटवार यांनी सांगितले.
ग्रीनडिस्पोचे वैशिष्ट्य
यात इंधनाचे अनुकूल प्रमाण कायम राखले जाते. सॅनिटरी नॅपकिन्सच्या ज्वलनाला आवश्यक ८०० डिग्रीपेक्षा अधिक तापमान प्राथमिक दहन चेंबरमध्ये निर्माण करून पॅडमधील उच्च सेल्यूलोज पदार्थ जाळून निर्जंतूक करतो. पॉलिमेरिक व क्लोरिनयुक्त रासायनिक पदार्थांच्या प्रदूषणमुक्त ज्वलनासाठी
त्यात सुधारणा करून चेंबरमध्ये १००० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान वाढ करून ते नियंत्रित करण्याची क्षमता यात आहे.