मुलीच्या सर्जरीसाठी संजयला पुन्हा महिनाभर पॅरोल मंजूर

By admin | Published: August 26, 2015 10:41 AM2015-08-26T10:41:05+5:302015-08-26T14:41:50+5:30

मुंबई बाँबस्फोटांदरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगणा-या संजय दत्तला मुलीच्या सर्जरीसाठी पुन्हा महिनाभराचा प२रोल मंजूर झाला आहे.

Sanjay approves parole for a month's surgery | मुलीच्या सर्जरीसाठी संजयला पुन्हा महिनाभर पॅरोल मंजूर

मुलीच्या सर्जरीसाठी संजयला पुन्हा महिनाभर पॅरोल मंजूर

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २६ - मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटांदरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी तुरूंगवासाची शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्तला पुन्हा ३० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. येत्या १-२ दिवसांत संजय पॅरोलवर बाहेर येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, संजयच्या मुलीच्या नाकावर होणार शस्त्रक्रिया असून त्यावेळी कुटुंबियांसोबत उपस्थित राहता यावे यासाठी संजयने पॅरोलसाठी (संचित रजा) अर्ज केला होता.  प्रशासनाकडून तो अर्ज मंजूर झाला असून कायदेशीर बाबींची पूर्तता करून येत्या १-२ दिवसांत संजय तुरूंगाबाहेर येईल असे समजते. 
१९९३ च्या बाँबस्फोटांमध्ये बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला न्यायालयाने पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच संजय सुमारे दीड वर्ष तुरुंगात होता त्यामुळे त्याला तीन वर्षांचीच शिक्षा भोगावी लागत आहे. 
 

Web Title: Sanjay approves parole for a month's surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.