संजय धोत्रेंनी निवडणूक खर्च लपविल्याचा आरोप
By admin | Published: July 3, 2015 11:44 PM2015-07-03T23:44:16+5:302015-07-03T23:44:16+5:30
निवडणूक आयोगाकडे तक्रार; चौकशी सुरू.
अकोला: गतवर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान स्टार प्रचारकांच्या खर्चापोटी खासदार संजय धोत्रे यांनी २६ लाख ९८ हजार ९२0 रुपयांचा निवडणूक खर्च लपविल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली असून, यासंदर्भात निवडणूक आयोगाने २५ जून रोजी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. एप्रिल २0१४ मध्ये लोकसभा निवडणूक पार पडली. त्यावेळी अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खा. संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ भाजपच्या ह्यस्टार प्रचारकह्ण नेत्यांच्या जाहिराती आणि त्यांच्या प्रवास खर्चापोटी झालेला २६ लाख ९८ हजार ९२0 रुपयांचा खर्च खा. संजय धोत्रे यांनी त्यांच्या निवडणूक खर्चात दाखविला नाही. यासंदर्भात अकोला जिल्हय़ातील हिंगणी येथील श्रीकृष्ण महादेव अडबोल यांनी २0 मार्च २0१५ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानुसार याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश निवडणूक आयोगामार्फत अकोल्याच्या जिल्हाधिकार्यांना देण्यात आला. निवडणूक आयोगाचा हा आदेश २५ जून २0१५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागामार्फत यासंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकार्यांकडून निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे. यासंदर्भात खा. संजय धोत्रे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ते कायद्याचा पालन करणारे आहे; निवडणूक खर्च लपविल्याबाबतचे वृत्त ह्यटीव्हीह्णवर पाहिले; मात्र याबाबत निवडणूक आयोग किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना अद्याप कोणतीही नोटीस मिळाली नाही. तक्रारकर्त्याने अपूर्ण माहितीच्या आधारे तक्रार केली असेल; परंतू जर काही चुकीचे किंवा नियमबाह्य काम केले असेल, तर कारवाई झाली पाहीजे, असे मत व्यक्त केले.
या स्टार प्रचारकांच्या जाहिराती आणि प्रवास खर्चापोटी लपविण्यात आला खर्च!
- भाजप नेते आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिराती व प्रवासाचा खर्च.
- तत्कालीन भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जाहिराती आणि हेलीकॉप्टर प्रवासाचा खर्च.
- भाजप नेते आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहिराती आणि हेलीकॉप्टरचा प्रवास खर्च.
- भाजप नेते व विद्यमान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या जाहिरातींचा खर्च.