२५६ दिवसांची रजा वगळून संजयला मिळणार ४५० रुपये वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2016 08:00 AM2016-02-24T08:00:56+5:302016-02-24T08:14:58+5:30
पाचवर्ष कारागृहात केलेल्या कामाचे मिळून संजयचे एकूण वेतन ३८ हजार रुपये होते. पण संजयने या वेतनातील निम्म्याहून जास्त हिस्सा जेल कॅंटीनमधून रोजच्या दैनंदिन वापराच्या वस्तू विकत घेण्यावर खर्च केला.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात पाच वर्ष कारावासाची शिक्षा झालेल्या संजय दत्तची गुरुवारी पुण्याच्या येरवडा तुरुंगातून सुटका होणार आहे. तीन वर्षांपासून तुरुंगात असलेल्या संजयने इथे कागदी पिशव्या बनवण्याचे काम केले.
पाचवर्ष कारागृहात केलेल्या कामाचे मिळून संजयचे एकूण वेतन ३८ हजार रुपये होते. पण संजयने या वेतनातील निम्म्याहून जास्त हिस्सा जेल कॅंटीनमधून रोजच्या दैनंदिन वापराच्या वस्तू विकत घेण्यावर खर्च केला. त्यामुळे तुरुंगातून बाहेर पडताना संजय फक्त ४५० रुपये वेतन घेऊन बाहेर पडणार आहे.
तुरुंगात संजयला दिवसाला ५० रुपये वेतन मिळत होते. संजय जे काम करत होता त्यासाठी दिवसाला आधी ३५ रुपये वेतन होते. एक सप्टेंबर २०१५ पासून या वेतनात १५ रुपयांची वाढ होऊन वेतन ५० रुपये झाले.
संजयचे पॅरोल आणि फर्लोनच्या रजेचे २५६ दिवस वगळून वेतन काढण्यात येणार असल्याचे तुरुंगातील सूत्रांनी सांगितले. २०१३ मध्ये तुरुंगात आल्यापासून संजय दत्त विविध कारणांसाठी २५६ दिवस रजेवर होता.