रजा वाढवण्यास नकार मिळाल्याने संजय पुन्हा तुरूंगात
By Admin | Published: January 8, 2015 12:04 PM2015-01-08T12:04:49+5:302015-01-08T12:05:39+5:30
संचित रजेत वाढ करावी अशी मागमी करणारा अभिनेता संजय दत्तचा अर्ज फेटाळण्यात आल्याने त्याची आज पुन्हा तुरूंगात रवानगी होणार आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - बेकायदा शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी येरवडा कारगृहात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तच्या संचित रजेचा (फर्लो) १४ दिवसांचा कालावधी आज संपत आहे. रजेत काही दिवसांची वाढ करावी अशी मागणी करणारा अर्ज संजयने केला होता मात्र तो मान्य न झाल्याने त्याला आज तुरूंगात परत जावे लागणार आहे.
१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांदरम्यान अवैधरित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी संजयला दोषी ठरवण्यात आले असून त्याला कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कारागृहाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक कैद्याला वर्षातून एकदा संचित रजा मिळते. २०१३ साली संजयला संचित रजा मिळाली होती. त्यानंतर २०१४ साली त्याने पुन्हा रजेसाठी अर्ज केला. २४ डिसेंबर रोजी त्याची १४ दिवसांची रजा मंजूर करण्यात आली होती. मात्र या रजेत आणखी काही दिवसांची वाढ करण्यात यावी असा अर्ज त्याने केला होता.