शनिवारवाड्यात संजय लीला भन्साळींचे पोस्टर जाळले
By Admin | Published: December 12, 2015 03:12 PM2015-12-12T15:12:52+5:302015-12-12T15:15:10+5:30
'बाजीराव मस्तानी' चित्रपटावरून अद्यापही वाद सुरूच असून या चित्रपटाविरोधात आज शनिवार वाड्यावर पेशव्यांच्या वंशजांनी जोरदार निदर्शने करत दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचे पोस्टर जाळण्यात आले.
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १२ - बहुचर्चित 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटावरून अद्यापही वाद सुरूच असून या चित्रपटाविरोधात आज शनिवार वाड्यावर पेशव्यांच्या वंशजांनी जोरदार निदर्शने केली. या चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले असून तो प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका घेत चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा फोटोही जाळण्यात आले. यावेळी पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा, पुष्कर पेशवे, ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघेही उपस्थित होते.
या चित्रपटात भन्साळींनी इतिहासाचे विकृतीकरण आणि बिभत्स रूप दाखवल्याची टीका ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांनी केली. तर चित्रपटातील गाणी व त्यात मांडण्यात आलेल्या घटनांचा निषेध करीत सिनेमा चित्रपटगृहांमध्ये चालू देणार नाही असा इशारा पेशव्यांचे वंशज व इतर संघटनांनी दिला.