Sanjay Raut Bail: कोर्टाने EDची मागणी फेटाळली; संजय राऊत यांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 04:04 PM2022-11-09T16:04:54+5:302022-11-09T16:05:08+5:30

Sanjay Raut Bail: संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी गेल्या 100 दिवसापासून न्यायलयीन कोठडीत होते.

Sanjay Raut Bail: Court rejects ED demand; Clear the way for Sanjay Raut to come out | Sanjay Raut Bail: कोर्टाने EDची मागणी फेटाळली; संजय राऊत यांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा

Sanjay Raut Bail: कोर्टाने EDची मागणी फेटाळली; संजय राऊत यांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा

googlenewsNext

Sanjay Raut Bail: मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसानंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. राऊतांना जामीन मंजूर झाल्यामुळे ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण असून, राऊतांच्या घरीही जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे.


संजय राऊतांचा मार्ग मोकळा
दरम्यान, संजय राऊत आणि प्रविण राऊत या दोघांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे EDला धक्का बसला असून ईडीने या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती केली होती. या निकालाचा अभ्यास करुन आम्हाला हायकोर्टात आव्हान देता येईल, त्यासाठी स्थगितीची मागणी ईडीने केली होती. पण, कोर्टाने ही विनंती अमान्य केली आहे. त्यामुळे आज संजय राऊत कोर्टातून सुटणार असल्याचे निश्चित झाले आहे.

संबंधित बातमी- 'संजय राऊतांवर दबाव होता, पण त्यांनी गद्दारी नाही केली', आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

काय आहे प्रकरण? 

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊत यांना प्रथम ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून संजय राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला आहे. संजय राऊत यांचे भाऊन प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. 

ईडीचा नेमका दावा काय?

दरम्यान, ईडीने केलेल्या दाव्यानुसार जीएपीसीएलने बेकायदेशीर कारवाईमधून 1039.89 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. प्रविण राऊत यांना एचडीआयएलकडून 100 कोटी रुपये मिळाले. हे पैसे नंतर वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये वळवण्यात आले. ही खाती प्रविण राऊत यांच्या जवळचे, कुटुंबातले सदस्य आणि व्यावसायिकांची आहेत. ज्यात संजय राऊत यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे, असं इडीने सांगितले. 2010 साली संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्या खात्यात प्रविण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी 83 लाख रुपये जमा केले होते.

Web Title: Sanjay Raut Bail: Court rejects ED demand; Clear the way for Sanjay Raut to come out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.