Sanjay Raut Trolled: 'बाबा चमत्कार' म्हणत मनसेने संजय राऊतांना पुन्हा डिवचलं; ठाण्यातील घटनेवरून केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 02:16 PM2022-07-07T14:16:26+5:302022-07-07T14:18:26+5:30

'सौ दाऊद, एक राऊत' असाही ट्विटमध्ये केला उल्लेख

Sanjay Raut brutally trolled as Baba Chamatkar by Raj Thackeray led MNS leader Gajanan Kale after Shivsena setback of thane TMC Eknath Shinde | Sanjay Raut Trolled: 'बाबा चमत्कार' म्हणत मनसेने संजय राऊतांना पुन्हा डिवचलं; ठाण्यातील घटनेवरून केली टीका

Sanjay Raut Trolled: 'बाबा चमत्कार' म्हणत मनसेने संजय राऊतांना पुन्हा डिवचलं; ठाण्यातील घटनेवरून केली टीका

Next

Sanjay Raut Trolled: बंडखोर आमदारांच्या समर्थनासह एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सत्तास्थापना केली. ठाण्यात एकहाती वर्चस्व असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. आता त्यांनी शिवसेनेला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असताना बुधवारी संध्याकाळी ठाणे पालिकेतील तब्बल ६६ माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आता शिवसेनेचा केवळ एकच नगरसेवक ठाकरे गटात आहे. याच मुद्द्यावरून मनसेनेसंजय राऊत यांना चमत्कार बाबा म्हणत टोला लगावला.

शिवसेनेतून बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे शिंदे गटातील आमदारांना परत बोलवत असताना संजय राऊत मात्र आक्रमक विधाने करत सुटले होते. त्यामुळे अखेर शिंदे गटाने भाजपासोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर संजय राऊत यांनी राज्यात ठिकठिकाणी दौरे सुरू केले. पण याच दरम्यान ठाणे महापालिकेत शिवसेनेला प्रचंड मोठं भगदाड पडलं. निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना ६६ नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. राऊत यांच्या विधानांमुळेच शिवसैनिक पक्ष सोडण्याचा निर्णय घेत असल्याची चर्चा आहे. तशातच मनसे नेते गजानन काळे यांनी संजय राऊतांना डिवचले. "चमत्कार बाबा' संजय राऊत यांच्यामुळे ठाण्यात नवाब सेनेत एकच नगरसेवक राहिला. त्याला बहुतेक महापौर करणार आता पक्षप्रमुख... सौ दाऊद, एक राऊत...", असे खोचक ट्वीट त्यांनी केले.

दरम्यान, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतरच ठाणे महापालिकेत शिवसेनेला मोठं खिंडार पडणार याची कुणकुण होती. अखेर काल संध्याकाळी नरेश म्हस्के यांच्यासोबत शिवसेनेच्या ६६ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून आपला पाठिंबा जाहीर केला. आता आगामी महापालिका निवडणुकीआधीच ठाण्यातील ६६ माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याने ठाकरे गटापुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता ठाण्यात नक्की कोण बाजी मारणार अन् राजकारण कसं पालटणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Sanjay Raut brutally trolled as Baba Chamatkar by Raj Thackeray led MNS leader Gajanan Kale after Shivsena setback of thane TMC Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.