“आतातरी शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळून टाका”; संजय राऊतांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 01:37 PM2021-04-17T13:37:39+5:302021-04-17T13:39:09+5:30

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आतातरी शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळून टाका, असे आवाहन विरोधकांना केले आहे.

sanjay raut criticised bjp over politics on corona situation | “आतातरी शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळून टाका”; संजय राऊतांचे आवाहन

“आतातरी शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळून टाका”; संजय राऊतांचे आवाहन

Next
ठळक मुद्देसंजय राऊत यांचे विरोधी पक्षाला आवाहनविरोधकांनी सहकार्य करावे - संजय राऊतराज्यात कोरोनाचा संसर्ग अधिकच झपाट्याने

मुंबई: राज्यातील कोरोनाची गंभीर परिस्थिती, कोरोना लसींचा तुटवडा, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता, १५ दिवसांसाठी लावण्यात आलेले निर्बंध यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती आता भीतीदायक होत चालली आहे. अशातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आतातरी शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळून टाका, असे आवाहन विरोधकांना केले आहे. (sanjay raut criticised bjp over politics on corona situation)

संजय राऊत यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात घेतला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. लस सुरक्षित आहे. सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी लस घ्या, असे आवाहन संजय राऊत यांनी केले. संजय राऊत यांनी कोरोना लसीचा पहिला डोस दिल्लीत संसद भवनात घेतला होता. 

“खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे”: जितेंद्र आव्हाड

विरोधकांनी सहकार्य करावे

महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडत आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले पाहिजे. लसीकरणावर राजकारण करू नका. देशभरात कोरोनाग्रस्तांच्या चिता जळत आहेत. त्या बघा आणि शहाणे व्हा. त्या चितेत राजकारण जाळून टाका, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. त्यांना साथ द्या. कोरोनाची लाट मोठी आहे. सहकार्य करा. केवळ टीका करण्यात वेळ घालवू नका, असेही राऊत म्हणाले.

कोरोनाचा संसर्ग अधिकच झपाट्याने

शुक्रवारी दिवसभरात राज्यात ६३ हजार ७२९ करोनाबाधित वाढले असून, ३९८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातीलर मृत्यू दर १.६१ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत ५९ हजार ५५१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. ४५ हजार ३३५ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३०,०४,३९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१२ टक्के एवढे झाले आहे.

निवडणुकांमध्ये कोरोनाची ‘रॅली’; बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून पुढचे १५ दिवस राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांशी संबंधित व्यक्तींना प्रवासाची आणि उद्योगांना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, विविध समाजघटकांसाठी अर्थसहाय्य करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 
 

Web Title: sanjay raut criticised bjp over politics on corona situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.