“औटघटकेचा खेळ, एकनाथ शिंदे गटाची ना घर का ना घाटका अशी अवस्था”; संजय राऊतांची बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 12:31 PM2023-07-06T12:31:40+5:302023-07-06T12:33:15+5:30

Sanjay Raut News: महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळतील हे नक्की, असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला आहे.

sanjay raut criticize shinde group and cm eknath shinde | “औटघटकेचा खेळ, एकनाथ शिंदे गटाची ना घर का ना घाटका अशी अवस्था”; संजय राऊतांची बोचरी टीका 

“औटघटकेचा खेळ, एकनाथ शिंदे गटाची ना घर का ना घाटका अशी अवस्था”; संजय राऊतांची बोचरी टीका 

googlenewsNext

Sanjay Raut News: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतल्यामुळे शिवसेना शिंदे गट नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात, असा दावाही करण्यात येत आहे. यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. 

ज्या बातम्या समोर येताहेत, त्यानुसार हे अपेक्षितच होते. हा औटघटकेचा खेळ होता. बहुमत १७० चे असतानाही ४० जणांचा एक गटा नव्याने आणला जातो, याचा अर्थ तुमची गरज संपली. आता आपण गाशा गुंडाळा. अजित पवार गटातील ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. पण शिंदे गटाच्या बाशिंग बांधून बसलेल्या लोकांना शपथ दिली जात नाही. मी परत एकदा दावा करतो की महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळतील हे नक्की, याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला. 

एकनाथ शिंदे गटाची ना घर का ना घाटका अशी अवस्था

एकनाथ शिंदे गटाची ना घर का ना घाटका अशी अवस्था झाली आहे. ही परिस्थिती त्यांनी स्वतःहून ओढून घेतली आहे. स्वाभिमान आणि जुनी वक्तव्य आठवत असतील, तर राजीनामे द्या. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकले त्यांच्यासोबत बसणार नाही, अजित पवारांमुळे आम्ही पक्ष सोडला असे म्हणणाऱ्यांनी आता राजीनामे द्या. मांडीला मांडी लावून काय, ते आता मांडीवरच येऊन बसले, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

दरम्यान, मणिपूरची स्थिती खूपच गंभीर होत चाललीय. केंद्र सरकार मणिपूरकडे बघायलाही तयार नाही. विरोधी पक्ष फोडण्यात, २०२४ च्या निवडणुकीत, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात सरकार व्यस्त आहेत. पण मणिपूर जळत आहे, लोक मारले जात आहेत. पण नरेंद्र मोदी बोलत नाही. इंटरनेट तोडलं म्हणजे मणिपूरला देशाशी तोडलं जातंय. हे जाणीवपूर्वक केलं जातंय. तिथून लक्ष हटवण्याकरता हा पक्ष तोडा तो पक्ष तोडा हे सुरू आहे. पंतप्रधानांना इतर राजकीय पक्ष तोडायला वेळ आहे. निवडणुकांचं बिगूल वाजवायला वेळ आहे. संघटनात्मक बदल करायला वेळ आहे. पण मणिपूरविषयी एक शब्द बोलायला तयार नाहीत, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: sanjay raut criticize shinde group and cm eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.