“बेळगाव वादग्रस्त इलाका, ना कर्नाटकचा, ना महाराष्ट्राचा, मुख्यमंत्र्यांनी...”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 12:32 PM2024-01-18T12:32:46+5:302024-01-18T12:41:07+5:30
Sanjay Raut News: राज्यात विविध घडामोडी सुरू असताना संजय राऊत यांनी बेळगावच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली.
Sanjay Raut News: आगामी लोकसभा निवडणुका, महाविकास आघाडीचे जागावाटप, आमदार अपात्रता प्रकरण यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बेळगावच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. बेळगाव हा वादग्रस्त इलाका आहे तो ना कर्नाटकचा आहे ना महाराष्ट्राचा आहे, अशी स्थिती असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिकेने कोरोना काळात उत्तम काम केले. या संपूर्ण काळामध्ये शिवसेनेचे किंवा इतर सामाजिक संस्थांच्या लोकांनी कोविड सेंटर चालवली त्या काळामध्ये गोरगरिबांना स्थलांतर कामगारांसाठी खिचडी वाटप झाले तरीही अनेक खोटे प्रकरण खोटे साक्षी पुरावे उभे करून हे प्रकरणे निर्माण करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच १३८ लोकांना खिचडी वाटप काम देण्यात आले. मात्र यात किती लोकांच्या चौकशी झाल्या, किती लोकांवर ते गुन्हे झाले, हेही समोर आणावे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
बेळगाव वादग्रस्त इलाका, ना कर्नाटकचा, ना महाराष्ट्राचा
बेळगाव हा वादग्रस्त इलाका आहे तो ना कर्नाटकचा आहे ना महाराष्ट्राचा आहे अशी ती स्थिती आहे, असे संजय राऊत म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे. राज्याचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहे, ते दावा करत आहे की, बेळगावच्या जेलमध्ये होतो बोलत होते. बेळगाव तुरुंगात असेल तर अजूनही तसा पुरावा आला नाही. जर ते जेलमध्ये होते. लाठी काठी खाल्ली असेल, तर त्यांनी या प्रश्नावर तोंड उघडायला पाहिजे होते, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.
दरम्यान, किमान ३८ अशा कंपन्या आहेत त्यांनी खिचडीचे वाटप केले नाही. मुंबई महानगरपालिकेकडून कोट्यावधी रुपये उकळले. पण हे सगळे करणारे त्यांचे मोरके हे शिंदे गटात, भाजपामध्ये आहेत. भाजपाशी संबंधित संस्था आणि एनजीओ आहेत, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला.