Sanjay Raut ED Action: 'ईडीच्या कारवाईला घाबरुन आमच्याकडे येऊ नका', एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 02:38 PM2022-07-31T14:38:22+5:302022-07-31T14:42:32+5:30

'संजय राऊतांची चौकशी सुरू आहे, त्यांना अटक होणार की नाही मला माहित नाही, मी ईडीचा अधिकारी नाही.'

Sanjay Raut ED Action: 'Don't come to us in fear of ED action', CM Eknath Shinde targets Sanjay Raut | Sanjay Raut ED Action: 'ईडीच्या कारवाईला घाबरुन आमच्याकडे येऊ नका', एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर निशाणा

Sanjay Raut ED Action: 'ईडीच्या कारवाईला घाबरुन आमच्याकडे येऊ नका', एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर निशाणा

googlenewsNext

औरंगाबाद: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भांडूपमधल्या राऊतांच्या मैत्री निवासस्थानी ईडीचे पथक दाखल झाले आहे. सकाळपासून राऊतांची चौकशी सुरू आहे. या चौकशीवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहे. या मुद्द्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित बातमी- 'पापाचा घडा भरला, संजय राऊतांना अटक होणार', खासदार नवनीत राणांचे टीकास्त्र

'कर नाही त्याला डर कशाला'
एकनाथ शिंदे सध्या औरंगाबादमध्ये पूर्वनियोजित दौऱ्यासाठी आले आहेत. यावेळी माध्यमांनी त्यांना राऊतांबद्दल विचारले. ते म्हणाले की, 'राऊतांची चौकशी सुरू आहे, त्यांना अटक होणार की नाही हे मला माहित नाही. मी ईडीचा अधिकारी नाही. चौकशी पूर्ण होऊ द्या, ते तर म्हणालेत ना की मी काही केलेलं नाही. कर नाही, त्याला डर कशाला. ते महाविकास आघाडीचे मोठे नेते होते, काय व्हायचं ते होऊद्या,' अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.

संबंधित बातमी- 'राज्यपालांच्या वक्तव्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी ईडीची कारवाई'; बाळासाहेब थोरातांची टीका

'...तर आमच्यासोबत येऊ नका'
'ईडीला घाबरुन शिवसेना सोडणार नाही', अशा आशयाचं ट्वीट राऊतांनी सकाळी केले. त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'असंही राऊतांना कुणी बोलावलंय का? मी आज जाहीरपणे सांगतो की, ईडीच्या भीतीने जर कोणी येत असाल तर कृपया आमच्याकडे येऊ नका. भाजपामध्ये नाही आणि शिवसेनेतही नाही. हे मी आज तुम्हाला जाहीरपणे सांगतोय. अर्जुन खोतकर असो नाहीतर आणखी कोणी असो, ईडीच्या कारवाईला घाबरुन कोणीही पुण्याचे काम करू नका,' अशी स्पष्टोकी त्यांनी दिली.
 

Web Title: Sanjay Raut ED Action: 'Don't come to us in fear of ED action', CM Eknath Shinde targets Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.