Sanjay Raut ED action: 'ते मला अटक करत आहेत, अटक व्हायला मी तयार', ईडी कार्यालयातून राऊतांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 05:51 PM2022-07-31T17:51:38+5:302022-07-31T17:51:46+5:30

'शिवसेनेला त्रास देण्यासाठी आणि महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी हे सगळं षडयंत्र सुरू आहे.'

Sanjay Raut ED action: 'They are arresting me, I am ready to be arrested', Sanjay Raut's reaction from ED office | Sanjay Raut ED action: 'ते मला अटक करत आहेत, अटक व्हायला मी तयार', ईडी कार्यालयातून राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut ED action: 'ते मला अटक करत आहेत, अटक व्हायला मी तयार', ईडी कार्यालयातून राऊतांची प्रतिक्रिया

googlenewsNext

Sanjay Raut ED action: पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. आज सकाळी 7 वाजेपासून राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी त्यांची चौकशी सुरू होती. ईडीच्या 8 ते 10 अधिकाऱ्यांकडून राऊतांची सूमारे 9 तास चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले.

संबंधित बातमी- "...याहीपेक्षा मोठे स्फोट मी करत राहीन"; ईडीने ताब्यात घेतल्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

संजय राऊत यांची चौकशी सुरू असताना त्यांच्या घराबाहेर शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील जमू लागले. त्यामुळे सुरक्षेसाठी पोलिसांसह सीआरपीएफचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतले. आता ईडी कार्यालयात राऊत यांचा जबाब नोंदवला जाईल. दरम्यान, संजय राऊत यांनी ईडीच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी परत एकदा 'झुकेंगे नहीं'चा नारा दिला. 

काय म्हणाले राऊत?
ईडीच्या कार्यालयाबाहेर माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, 'माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, मी महाराष्ट्राशी कधीच बेईमानी करणार नाही. ते मला अटक करत आहेत, मी अटक व्हायला तयार आहे. शिवसेनेला त्रास देण्यासाठी आणि महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी हे सगळं षडयंत्र सुरू आहे.'

'महाराष्ट्र कमजोर होतोय'
'मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. आम्ही लढणार, शिवसेना अन् महाराष्ट्र इतका कमजोर नाही. माझ्याविरोधात खोटी कारवाई, खोटे खटले टाकले. काहीही झाले तरी मी पक्ष सोडणार नाही.' राऊतांवरील कारवाईवर आमदार संजय शिरसाट यांनी आनंद व्यक्त केला. त्यावर बोलताना राऊत म्हाले की, 'पेढे वाटा, महाराष्ट्र कमजोर होतोय, तुम्ही पेढे वाटत बसा. बेशरम लोक आहात तुम्ही,' अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

Web Title: Sanjay Raut ED action: 'They are arresting me, I am ready to be arrested', Sanjay Raut's reaction from ED office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.