'संजय राऊतांच्या भोंग्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात', सुनील राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 06:22 PM2022-08-02T18:22:24+5:302022-08-02T18:23:25+5:30

सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झाला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

Sanjay Raut ED arrest: 'You became Chief Minister because of Sanjay Raut', Sunil Raut criticizes Eknath Shinde | 'संजय राऊतांच्या भोंग्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात', सुनील राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका

'संजय राऊतांच्या भोंग्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात', सुनील राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका

googlenewsNext

मुंबई: शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राऊतांवर बोचरी टीका केली होती. 'सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झाला', असे शिंदे यांनी म्हटले होते. त्यांच्या टीकेला आता संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत (Sunil Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

'...तर तुम्ही मुख्यमंत्री झाले असते का?'

मीडियाशी संवाद साधताना सुनील राऊत यांना मुख्यमंत्यांच्या टीकेविषयी विचारण्यात आले. त्यावर सुनील राऊत म्हणाले की, 'संजय राऊत यांचा भोंगा सुरू होता, म्हणूनच महाविकास आघाडी झाली. महाविकास आघाडी झाल्यामुळे एकनाथ शिंदेंना नगरविकास खाते मिळाले. हा भोंगा वाजला नसता तर शिंदेंना नगरविकास खाते मिळाले असते का? हा भोंगा वाजला नसता तर एकनाथ एकनाथ शिंदे मंत्री झाले असते का? शिंदेंना जे काही मिळाले ते या भोंग्यामुळेच,' अशा शब्दात त्यांनी टीका केली.

'संजय राऊत यातून परफेक्टपणे बाहेर पडतील'

सुनील राऊत पुढे म्हणाले की, 'संजय राऊत नेहमी भाजपच्या विरोधात बोलतात, त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्धव ठाकरेंना कमजोर करण्याचे षडयंत्र आहे, त्यामुळेच बोगस प्रकरणे त्यांच्यामागे लावण्यात आली. ईडी काहीही आरोप लावेल, मीही उद्या ईडीवर आरोप करू शकतो,' असे सुनील म्हणाले. याशिवाय, जो भाजपला सरेंडर होतो, त्यांना क्लिनचीट मिळते. पण संजय राऊत ईडीला सामोरे गेले. यातून ते परफेक्टपणे बाहेर पडतील', असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Sanjay Raut ED arrest: 'You became Chief Minister because of Sanjay Raut', Sunil Raut criticizes Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.