Sanjay Raut: "फडणवीसांचे मन अशांत, यावर त्यांनी एक उपाय करावा...", संजय राऊतांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 11:33 AM2022-04-26T11:33:31+5:302022-04-26T11:34:05+5:30

Sanjay Raut: ''मी पुन्हा येईन, असे सांगूनही देवेंद्र फडणवीस सत्तेत आले नाहीत. पुढची 25 वर्षे ते सत्तेत येणार नाहीत."

Sanjay Raut: "Fadnavis's mind is restless, they should take a solution", criticism of Sanjay Raut | Sanjay Raut: "फडणवीसांचे मन अशांत, यावर त्यांनी एक उपाय करावा...", संजय राऊतांची खोचक टीका

Sanjay Raut: "फडणवीसांचे मन अशांत, यावर त्यांनी एक उपाय करावा...", संजय राऊतांची खोचक टीका

googlenewsNext

मुंबई: हनुमान चालिसेवरुन राज्यातील राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान करणाऱ्या राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर भाजपकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जातीये. यातच आता संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केलीये. ''देवेंद्र फडणवीस यांचे मन अशांत आहे, त्यांनी हनुमान चालीसा पठण करावी,'' असा सल्ला राऊतांनी दिला आहे.

'हनुमान चालीसा वाचावी'
आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, ''मी पुन्हा येईन, असे सांगूनही देवेंद्र फडणवीस सत्तेत आले नाहीत. पुढची 25 वर्षे त्यांची सत्ता येऊ शकणार नाही. त्यामुळेच त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यांचे मन अशांत झाले आहे, अशा अशांत मनावर एकच उपचार आहे, तो म्हणजे फडणवीसांनी आपल्या देवघरात हनुमान चालीसा वाचावी. त्यामुळे फडणवीसांचे मन शांत होईल," असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे. 

'शरद पवार बरोबर बोलले'
संजय राऊत यांनी यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांबाबत केलेल्या विधानाचा दाखला देखील दिला. "शरद पवारांनी खूप चांगलं वक्तव्य केलं. सरकार येऊ शकलं नाही म्हणून जी अस्वस्थता निर्माण झाली आहे ती फडणसींच्या लाऊडस्पीकरमधून बाहेर पडत आहे. सत्ता न आल्यानं निर्माण झालेल अस्वस्थता त्यांनी घरात बसून हनुमान चालीसा म्हणून मन शांत करावं", असं संजय राऊत म्हणाले. 

'टोमॅटो सॉस लावून जखमी झाल्याचा दावा'
यावेळी संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला. "एक माथेफिरू सध्या ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करत जगभर फिरत असेल तर अशा व्यक्तीच्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे", असा खोचक टोला संजय राऊत यांनी सोमय्यांना लगावला आहे. 

Web Title: Sanjay Raut: "Fadnavis's mind is restless, they should take a solution", criticism of Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.