‘त्या’ विधानावरून संजय राऊत यांची अखेर माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 06:17 AM2023-01-19T06:17:18+5:302023-01-19T06:17:51+5:30

कोरोना काळाचा उल्लेख करताना डॉक्टर आणि परिचारिकांबद्दल केलं होतं विधान

Sanjay Raut finally retracted from 'that' statement | ‘त्या’ विधानावरून संजय राऊत यांची अखेर माघार

‘त्या’ विधानावरून संजय राऊत यांची अखेर माघार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : 'मला तसे बोलायचे नव्हते. कोरोना काळात डॉक्टर आणि परिचारिकांनी सर्वाधिक रुग्णसेवा केली आहे. ते तर पांढऱ्या वेशातील देवदूतच' असे विधान शिवसेना नेते  खासदार संजय राऊत यांनी केले. 'कोरोना काळात डॉक्टर आणि परिचारिका घाबरून पळ काढत' असे वक्तव्य केल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनने राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. त्यावर बुधवारी राऊत यांनी सारवासारव केली.

संजय राऊत यांनी मंगळवारी वादग्रस्त विधान केल्याने राज्यातील डॉक्टर नाराज झाले. राऊत यांच्या या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी माफी मागावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा आयएमएकडून देण्यात आला. त्यानंतर राऊत यांनी विधानामागील भूमिका स्पष्ट केली. 

Web Title: Sanjay Raut finally retracted from 'that' statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.