Sanjay Raut : 'ही खंडणी नाही का? आप क्रोनोलॉजी समजिए', संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांवर आणखी एक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 10:24 AM2022-05-09T10:24:15+5:302022-05-09T10:26:43+5:30

Sanjay Raut alligation on Kirit Somaiya : ''ज्या कंपनीविरोधात किरीट सोमय्यांनी आरोप केले होते. त्याच कंपनीकडून सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला."

Sanjay Raut: 'Isn't this a extortion? You understand the chronology ', another allegation of Sanjay Raut against Kirit Somaiya | Sanjay Raut : 'ही खंडणी नाही का? आप क्रोनोलॉजी समजिए', संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांवर आणखी एक आरोप

Sanjay Raut : 'ही खंडणी नाही का? आप क्रोनोलॉजी समजिए', संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांवर आणखी एक आरोप

googlenewsNext

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) सातत्याने भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत. आता आज पुन्हा एकदा राऊतांनी सोमय्यांवर मोठा आरोप केला आहे. 'किरीट सोमय्या यांनी ज्या कंपनीवर आरोप केले होते, त्याच कंपनीने सोमय्यांच्या संस्थेला कोट्यवधींची देणगी दिली,' असा आरोप राऊत यांनी केला आहे. 

भाजप नेते किरीट सोमय्या ठाकरे सरकारमधील विशेषत: शिवसेनेच्या नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यास सुरुवात केली. भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्यांनी जवलेल्या निधीत अपहार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यानंतर आता 'आप क्रोनोलॉजी समजिए' म्हणत संजय राऊत यांनी सोमय्या आणि ईडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

'आप क्रोनोलॉजी समजिए'
संजय राऊत यांनी आज सोमय्यांविरोधात दोन ट्वीट केले आहेत. संजय राऊत म्हणतात की, ''2013-14 मध्ये किरीट सोमय्या यांनी एका कंपनीविरोधात आरोप केले होते. 2016 मध्ये कंपनीच्या प्रमुखाची ईडीने चौकशीदेखील केली. त्यानंतर 2018-19 मध्ये सोमय्या यांच्याशी संबंधित युवक प्रतिष्ठानला याच कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला. आप क्रोनोलॉजी समजिए. मी तक्रार दाखल करणार,'' असे राऊत म्हणाले.

'ही खंडणी नाही का?'
त्यापूर्वी संजय राऊत यांनी सकाळी 'ही खंडणी नाही का?', असे म्हणत एक ट्वीट केले होते. "ईडी, सीबीआय, आयकर विभाग, सेबी यांच्या रडारवर असलेल्या कंपन्यांकडून किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला कोट्यवधींचा निधी कसा काय मिळाला? हा काळा पैसा पांढरा करण्याचा डाव आहे. याचा हिशोब द्यावाच लागणार. मी धर्मादाय आयुक्त आणि तपास यंत्रणांकडे तक्रार केली आहे," असे संजय राऊत म्हणाले.
 

Web Title: Sanjay Raut: 'Isn't this a extortion? You understand the chronology ', another allegation of Sanjay Raut against Kirit Somaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.