Sanjay Raut: 'मराठी भाषेविरोधात हा दलाल कोर्टात गेला'; संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 04:44 PM2022-02-15T16:44:35+5:302022-02-15T16:44:45+5:30

संजय राऊत यांच्याकडून किरीट सोमय्यांचा 'मुलुंडचा दलाल' असा उल्लेख आहे.

Sanjay Raut: 'Kirit Somaiya went to court against Marathi language'; Sanjay Raut's slams Somaiya | Sanjay Raut: 'मराठी भाषेविरोधात हा दलाल कोर्टात गेला'; संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर घणाघात

Sanjay Raut: 'मराठी भाषेविरोधात हा दलाल कोर्टात गेला'; संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर घणाघात

googlenewsNext

मुंबई: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्याकडून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला गेला.  यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खालच्या पातळीची टीका केलेली पाहायला मिळाली आहे.

किरीट सोमय्या हा माणूस मराठीचा द्वेष करतो. या सोमय्याने मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्ती केल्यानंतर कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. महाराष्ट्रात मराठी सक्ती नको म्हणून हा माणूस पुढे आला होता आणि हाच माणूस भाजपचा प्रमुख नेता आहे. आधी याचे थोबाड बंद करा. मराठीचा द्वेष करणाऱ्या या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार, अशी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली.

'मुलुंडचा दलाल', असा उल्लेख

मागील काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून मविआ नेत्यांवर सुरु असलेल्या आरोपानंतर आज संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका करत, सोमय्यांचा उल्लेख  'मुलुंडचा दलाल' असा केला आहे. तसेच, केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवरही राऊतांनी टीका केली. भाजपाचे काही प्रमुख लोक मला भेटले. त्यांनी मला वांरवार हे सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. मी प्रत्येक वेळेस नकार दिला, त्यानंतर माझ्या जवळच्या व्यक्तींवर ईडीच्या धाडी टाकल्या. मुद्दाम त्रास देण्यात आला.

'...तर सोमय्याला जोड्याने मारेन'

यावेळी संजय राऊत यांनी सोमय्यांना थेट आव्हान दिले. ठाकरे कुटुंबाचे 19 बंगले आहेत, असा आरोप सोमय्यांकडून केला जातो. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, आपण चार बसेस करून पिकनीकला जाऊ. जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर मी राजकारण सोडेन आणि जर बंगले दिसले नाही तर त्या दलालाला जोड्याने मारेन. सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्रात ठिणगी पडेल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
 

Web Title: Sanjay Raut: 'Kirit Somaiya went to court against Marathi language'; Sanjay Raut's slams Somaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.