Sanjay Raut vs BJP: "संजय राऊत अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 09:11 PM2022-12-16T21:11:30+5:302022-12-16T21:16:15+5:30

भाजपा आमदाराचा राऊतांसह ठाकरे गटावरही घणाघात

Sanjay Raut leaves no chance to spread ignorance states BJP MLA slams Uddhav Thackeray group | Sanjay Raut vs BJP: "संजय राऊत अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाहीत"

Sanjay Raut vs BJP: "संजय राऊत अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाहीत"

googlenewsNext

Sanjay Raut vs BJP: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना भाजपा विधीमंडळाचे उपनेते आमदार भाई गिरकर यांनी दोन पुस्तके कुरियर केली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने छापलेली अशी दोन पुस्तके आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला यावरुन वाद निर्माण करण्याचे प्रयत्न उद्धवजींच्या शिवसेनेकडून जाणीवपूर्वक सुरु आहेत. भारतातील संबंध आंबेडकर प्रेमींच्या मनात यामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्यावेळी शेतकऱ्यावर संकट ओढवते, तेव्हा त्याला अस्मानी किंवा सुलतानी संकट म्हटले जाते. त्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानाचा वाद निर्माण करुन उद्धवजींच्या शिवसेनेने अफगाणी संकट निर्माण केले आहे, अशा शब्दांत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.

"संजय राऊत अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाहीत"

"उद्धव ठाकरेंची सेना हे का करत आहे, असे प्रश्न पडले आहेत. आपले अज्ञान पाजळण्याची एकही संधी संजय राऊत सोडत नाहीत. आम्ही मागेही पाहिले होते. डॉक्टर चांगली औषधे देतो की कम्पांऊडर चांगली देतो, या वादात आम्हाला पडायचे नाही. WHO चे सल्लागार कोण असू शकतात याबाबतही त्यांनी अज्ञान पाजळले आहे. या दोन प्रसंगानंतर यांची मस्ती आणि मिजाज परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळावरुन खोटी माहिती पसरविण्यापर्यंत गेलीये. ही खोटी माहिती पसरविणे अक्षम्य चूक आहे. हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न का होतोय?" असे शेलारांनी सुनावले.

राऊतांनी चुकीची माहिती दिल्यावरही माफी न मागणं म्हणजे अहंकाराचा परमोच्च बिंदू!

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत उद्धवजींच्या सेनेचं इतकं अज्ञान? समता, बंधुता, स्वातंत्र्य यावर आधारीत असलेल्या संविधानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म दिला, हे तरी उद्धव ठाकरेंच्या सेनेला मान्य आहे का? गरिब, दलित, शोषित समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज दिला, हे तरी त्यांना मान्य आहे का? स्वातंत्र्यापासून नवीन भारत घडविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी योगदान दिले, हे तरी त्यांना मान्य आहे का? नाहीतर या सर्व गोष्टी उद्धवजींमुळेच झाल्यात, असंही संजय राऊत सामनात छापायला मागे पुढे पाहणार नाहीत. राऊत यांनी चुकीची माहिती दिल्यानंतरही माफी किंवा दिलगिरी व्यक्त केलेली नाही. हा अहंकाराचा परमोच्च बिंदू आहे. भारतीय जनता पक्षाला हे मान्य नाही. ज्या काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव केला, त्या काँग्रेससोबत जाऊन उद्धवजींच्या सेनेने आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून भाजप याचा निषेध करत आहे," अशी माहिती आशिष शेलारांनी सांगितले.

Web Title: Sanjay Raut leaves no chance to spread ignorance states BJP MLA slams Uddhav Thackeray group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.