Mohit Kamboj: "संजय राऊतांनी सामनाच्या कार्यालयात धमकावून 25 लाख रुपये घेतले", भाजप नेत्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 04:06 PM2022-04-07T16:06:45+5:302022-04-07T16:06:58+5:30

Mohit Kamboj allegation on Sanjay Raut: "माझ्याकडे पुरावे आहेत, मुंबई पोलीस गुन्हा दाखल करणार का?''

Sanjay Raut | Mohit Kamboj | "Sanjay Raut took Rs 25 lakh by threatening me in Saamana office", serious allegations of Mohit Kamboj | Mohit Kamboj: "संजय राऊतांनी सामनाच्या कार्यालयात धमकावून 25 लाख रुपये घेतले", भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Mohit Kamboj: "संजय राऊतांनी सामनाच्या कार्यालयात धमकावून 25 लाख रुपये घेतले", भाजप नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई:शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच सक्तवसुली संचालनालयाने(ED) राऊत यांची 11 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. या कारवाईनंतर आता भाजप नेत्याने राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजप नेते मोहित कंबोज(Mohit Kamboj) यांनी संजय राऊत यांच्यावर धमकावून लाखो रुपये घेतल्याचा आरोप केला आहे.

राऊतांवर धमकावून पैसे घेतल्याचा आरोप
केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाईनंतर भाजप विरुद्ध शिवसेना वाद पेटलेला पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यातच बुधवारी ईडीने संजय राऊथ यांची संपत्ती जप्त केल्यानंतर राजकीय हालचालींना आणखी वेग आला. यानंतर आता आज भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्यावर धमकावल्याचा आणि पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. 

मोहित कंबोज यांचं ट्वीट-


'पोलीस गुन्हा दाखल करणार का?' 
मोहित कंबोज यांनी व्हिडीओ शेअर करत राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ''संजय राऊत यांनी 2014 साली मला सामनाच्या कार्यालयात बोलावले आणि धमकावून पैशांची मागणी केली. त्यांनी मला 50 लाखांची मागणी केली होती. त्यातील 25 लाख चेक स्वरुपात घेतले. हे पैसे व्याजासह परत करणार असल्याचे त्यांनी सांगितले, पण अजून पैसे परत केले नाहीत. या प्रकरणात माझ्याकडे पुरावे आहेत, मी तक्रारही करत आहे. संजय पांडे, तुम्ही गुन्हा दाखल करणार का?'' असा सवाल कंबोज यांनी उपस्थित केला आहे.
 

Web Title: Sanjay Raut | Mohit Kamboj | "Sanjay Raut took Rs 25 lakh by threatening me in Saamana office", serious allegations of Mohit Kamboj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.