Sanjay Raut: संजय राऊतांचे नवनीत राणांवर गंभीर आरोप; आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 10:28 AM2022-04-27T10:28:31+5:302022-04-27T10:28:38+5:30
Sanjay Raut: ''लकडवालाच्या काळ्या धनातील कोट्यवधी रुपये नवनीत राणाच्या अकाउंटमध्ये आहेत."
मुंबई: हनुमान चालीसा प्रकरणात तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी नवनीत राणांवर 'D' गँगशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. राऊतांनी मंगळवारी रात्री ट्विट करत नवनीत राणांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी कनेक्शन असलेल्या युसूफ लकडावालाशी आर्थिक संबंध असल्याचा दावा केलाय. त्यामुळे आता नवनीत राणा यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अंडरवर्ल्ड कनेक्शन :
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 27, 2022
लकड़ावाला को ED ने ₹200 करोड़ के मनी लांड्रिंग केस में अरेस्ट किया था, लॉकअप में ही उसकी डेथ हो गई। यूसुफ की गैरकानूनी कमाई का हिस्सा अब भी नवनीत राणा के अकाउंट में है।तो ED कब पिलाएगी राणा को चाय?क्यों बचाया जा रहा है इस D-गैंग को? बीजेपी चूप क्यूँ हैं? pic.twitter.com/hJ1itnitlL
संजय राऊतांचा भाजपला सवाल
आजही संजय राऊत यांनी ट्विट करत राणा दाम्पत्य आणि D गँगचा संबंध असल्याचे म्हटले आहे. ''लकडवालाला ED ने 200 कोटी रुपयांच्या मनी लांड्रिंग प्रकरणात अटक केली होती. तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या काळ्या धनातील मोठा हिस्सा अजूनही नवनीत राणाच्या अकाउंटमध्ये आहे. आता ED राणांना चहा कधी पाजणार? या D गँगला का वाचवले जात आहे? भाजप आता शांत का आहे?" असे सवाल राऊत यांनी केले आहेत.
नवनीत राणा ने युसुफ लकड़ावाला से ₹80 लाख का लोन लिया था,जिनकी जेल में मौत हो गई थी।उसी लकड़ावाला को @dir_ed ने मनी लॉन्ड्रिंग मामले में गिरफ्तार किया था व उसके डी गैंग से संबंध भी थे।
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 26, 2022
मेरा सवाल-क्या ED ने इसकी जांच की ? राष्ट्रीय सुरक्षा का मामला है! @KiritSomaiya@sanjayp_1pic.twitter.com/u0h8cmT0He
राऊत काल काय म्हणाले?
नवनीत राणा यांनी युसुफ लकडावाला याच्याकडून 80 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्याबाबतचा एक फोटोही राऊतांनी ट्विटरवर शेअर केलाय. युसुफ लकडावाला याचा काही दिवसांपूर्वीच तुरुंगात मृत्यू झाला होता. याच लकडावालाला ईडीने पैशांची अफरातफर आणि दाऊद गँगशी संबंध असल्याप्रकरणी अटक केली होती, असे ट्विट राऊतांनी केले. यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखेकडून नवनीत राणा आणि युसूफ लकडावाला यांच्यातील या आर्थिक व्यवहाराची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नवनीत राणांच्या अडचणीत वाढ
राजद्रोहाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्यावर संजय राऊतांनी गंभीर आरोप केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारकडून आता नवनीत राणा आणि युसूफ लकडावाला यांच्यातील व्यवहाराबाबत चौकशी करण्यासाठी तक्रार दाखल केली जाऊ शकते. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात करेल. आता राऊतांच्या आरोपांवर नवनीत राणा काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे आहे.