उद्धव-राज ठाकरे भेटीवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “दोघांनाही ओळखतो, पण...”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 02:43 PM2023-08-08T14:43:30+5:302023-08-08T14:43:54+5:30

Sanjay Raut News: उद्धव आणि राज ठाकरे या दोघांमध्ये एकत्र येण्यासंदर्भात बोलणी होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

sanjay raut reaction over uddhav thackeray and raj thackeray together to meet | उद्धव-राज ठाकरे भेटीवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “दोघांनाही ओळखतो, पण...”

उद्धव-राज ठाकरे भेटीवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “दोघांनाही ओळखतो, पण...”

googlenewsNext

Sanjay Raut News:उद्धव ठाकरे हे दादर येथे उभारल्या जात असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत. बाळासाहेबांची शिवाजी पार्कवर दसऱ्याला जी भाषणे झाली त्यातील काही भाषणांच्या ध्वनिफिती उद्धव यांच्याकडे उपलब्ध नाहीत. ज्या ध्वनिफिती त्यांच्याकडे नाहीत त्यांपैकी बहुतेक सर्व या राज ठाकरे यांच्याकडे असू शकतात. कारण, राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी त्याकाळी बाळासाहेबांची भाषणे ध्वनिमुद्रित केलेली होती. राज यांच्याकडील या ध्वनिफिती मिळवायच्या तर त्यांच्याशी उद्धव यांना चर्चा करावी लागणार आहे. त्यावेळी दोघांमध्ये एकत्र येण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या मुद्द्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ते दोघे भाऊ आहेत. दोन भाऊ एकमेकांना कधीही भेटू शकतात, चर्चा करू शकतात. यामध्ये तिसऱ्या माणसाला पडण्याची गरज नाही. मी दोघांनाही ओळखतो, दोघांशीही माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पण राजकीय विषय येतो, तेव्हा मी मनापासून माझे पूर्ण कुटूंब आणि सहकारी कायम बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

इतिहासातील सर्वांत मोठा पराभव कुठे होणार असेल तर...

संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. त्यांच्या पायाखालची वाळू सरकतेय. २०२४ च्या निवडणुकीत समोरे जाताना आत्मविश्वास राहिलेला नाही. त्यामुळे हा पक्ष तोडा, तो पक्ष तोडा आणि मग एनडीएचे शेपूट जोडा. ते महाराष्ट्र सदनात येणार असतील. पण, एनडीएचा सर्वांत मोठा पराभव महाराष्ट्रातच होणार. इतिहासातील सर्वांत मोठा पराभव कुठे होणार असेल तर बिहार ,महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, केरळ, तेलंगणा या प्रमुख एनडीएचा पराभव होईल. त्यांनी महाराष्ट्र सदनात जास्तीत जास्त बैठका घ्यायला हव्यात, असे संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहून जनता अस्वस्थ आहे. जनतेला हे आवडले नाही. या असंतोषाचा जनक होण्याची क्षमता फक्त राज ठाकरेंमध्ये आहे. उद्धव ठाकरेंनी हे समजून घेतले पाहिजे. राज ठाकरेंना आशीर्वाद देऊन त्यांच्याकडे नेतृत्व दिले पाहिजे. राज ठाकरेंसारखा लोकप्रिय कार्यक्षम नेता मिळणे अवघड आहे. क्षमता असलेल्या माणसाला त्याच्या क्षमतेप्रमाणे काम देण्याची खरं नेतृत्व राज ठाकरेंकडे आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची महाराष्ट्राची गरज आहे. त्यामुळे कुणाच्या मध्यस्थीशिवाय या दोघांनी एकत्र यावे, असे मत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले.

 

Web Title: sanjay raut reaction over uddhav thackeray and raj thackeray together to meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.