Sanjay Raut: संजय राऊत यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच; कोठडीत 14 दिवसांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 02:11 PM2022-09-19T14:11:07+5:302022-09-19T14:22:21+5:30
पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊत कोठडीत आहेत.
Sanjay Raut Hearing : मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ (Patra Chawl) घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना कोर्टाने (Mumbai Sessions Court) पुन्हा एकदा दणका दिलाय. संजय राऊतांचीन्यायालयीन कोठडी आज संपणार होती, पण आजच्या सुनावणीत कोर्टाने त्यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे. सुरुवातीपासूनच संजय राऊत यांना जामीन मिळू नये, अशी ईडीचा भूमिका होती.
मुंबईतील 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ED) संजय राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली होती.
संजय राऊत यांचा मुक्काम 4 ऑक्टोबरपर्यंत आर्थर रोड तुरुंगातच असणार आहे. दरम्यान संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी विशेष न्यायालयाकडे अर्ज केला. मात्र, ईडीने संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला. पत्राचाळ प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत संजय राऊत यांना जामीन देऊ नये, अशी ईडीची भूमिका आहे.