Sanjay Raut: "शिंदे गटात काय सुरूय याची माझ्याकडे पक्की खबर, वेळ आली की...", संजय राऊत यांचं मोठं विधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 01:21 PM2022-12-02T13:21:23+5:302022-12-02T13:22:09+5:30
नाशिक दौऱ्यावर असलेल्या खासदार संजय राऊत यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला.
नाशिक-
नाशिक दौऱ्यावर असलेल्या खासदार संजय राऊत यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. शिंदे गटात काय सुरू आहे याची पक्की खबर माझ्याकडे आहे. वेळ आली की जबरदस्त स्फोट होईल आणि वस्तूस्थिती समोर येईल, असं महत्वाचं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
PM मोदींना रावण म्हटलेलं मलाही आवडलेलं नाही, पण...; संजय राऊतांची भाजपाला चपराक
"शिवसेना आजही आहे तिथंच आहे. कारण पालापाचोळा उडून गेल्यानं शिवसेनेला फरक पडत नाही. तुम्ही किती खोके द्या. जनता खोक्याला विकली जात नाही. सध्या शिंदे गटात काय सुरू आहे याची पक्की खबर माझ्याकडे आहे. वेळ आली की सगळं काही सांगेन. योग्य वेळ आली की बरोबर स्फोट होतील आणि तेव्हा वस्तूस्थिती समोर येईल", असं संजय राऊत म्हणाले.
कर्नाटकनं सोडलेल्या पाण्यात मुख्यमंत्री अन् सरकारनं जलसमाधी घ्यावी; संजय राऊतांचा घणाघात
'गद्दार' हे त्यांच्या कपाळावर कोरलं गेलंय
"ज्या पद्धतीनं दिवार सिनेमात अमिताभ बच्चनच्या हातावर 'मेरा बाप चोर है' कोरलं गेलं होतं. त्याचपद्धतीनं या गद्दारांच्या माथ्यावर गद्दारी कोरली गेली आहे. त्यांची बायका, पोरं आणि नातेवाईक यांच्या पिढ्यानपिढ्यांना गद्दारी लक्षात राहील. जनता कधीच काही विसरत नाही. तुम्ही आताही निवडणूक घ्या शिवसेनाच निवडून येईल", असंही राऊत म्हणाले.
मोदींना रावण म्हटलेलं मलाही आवडलेलं नाही, पण...
"गुजरातच्या प्रचारसभेत मोदी हे १०० तोंडाचे रावण आहेत असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले त्यावर रान उठवलं गेलं. देशाच्या पंतप्रधानांना असं रावण संबोधनं मलाही वैयक्तिक पातळीवर पटलेलं नाही. पण मोदींनी याच मुद्द्यावरुन जनतेसमोर अश्रू ढाळले आणि हा गुजरातचा अपमान असल्याचं म्हटलं. मोदींना रावण म्हटल्यावर राज्याचा अपमान होतो. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यावर महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? म्हणजे मोदींचा झालेला अपमान भाजपाला दिसतो. पण शिवाजी महाराजांचा अपमान दिसत नाही. अशी ही दुटप्पी भूमिका भाजपा घेत आहे", असं संजय राऊत म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"