मी वापरलेला 'तो' शब्द योग्यच, काय तक्रार करायची ती करा; संजय राऊतांचा विरोधकांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 05:30 PM2021-12-09T17:30:14+5:302021-12-09T19:20:18+5:30

'राष्ट्र भाषेचे काही शब्दकोश पाहिले तर मी वापरलेला शब्द चुकीचा नसून त्याचा अर्थ अनेक ठिकाणी मूर्ख असा आहे.'

Sanjay Raut says- I never used unparliamentary words | मी वापरलेला 'तो' शब्द योग्यच, काय तक्रार करायची ती करा; संजय राऊतांचा विरोधकांवर निशाणा

मी वापरलेला 'तो' शब्द योग्यच, काय तक्रार करायची ती करा; संजय राऊतांचा विरोधकांवर निशाणा

Next

नवी दिल्ली: सध्या भाजप नेते आणि शिवसेना खासदार संजय राऊत आमने-सामने आलेले पाहायला मिळत आहेत. संजय राऊत यांनी वापरलेल्या 'त्या' शब्दाला भाजपकडून जोरदार आक्षेप घेतला जात आहे. राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही भाजपकडून करण्यात येत आहे. दरम्यान, संजय राऊत आपल्या शब्दापर ठाम असून, काय तक्रार करायची ती करा, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी भाजपला सुनावले आहे.

संजय राऊतांनी मीडियाशी संवाद साधताना टीकाकारांना '**या' असा शब्द वापराल होता. त्यानंतर भाजपने त्यावर आक्षेप घेऊन राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, या अशिक्षित आणि अडाणी लोकांना काही कळत नाही. हे लोक हिंदी भाषेचा फार आग्रह धरत असतात, पण राष्ट्र भाषेचे काही शब्दकोश पाहिले तर मी वापरलेला शब्द चुकीचा नसून त्याचा अर्थ अनेक ठिकाणी मूर्ख असा आहे, असं राऊत म्हणाले. 

त्यांनी अभ्यास करावा
राऊत पुढे म्हणाले की, टीकाकारांनी अभ्यास केला पाहिजे. मला वाटले होते भाजप हा सुशिक्षित लोकांचा पक्ष आहे. त्यांचे वाचन चांगले आहे. ते रामभाऊ म्हाळगी सारखी संस्था चालवतात. तिथे सुक्षित कार्यकर्ते निर्माण करतात, असं वाटत होतं. पण अशा प्रकारचे कार्यकर्ते ते निर्माण करतात हे मला माहीत नव्हतं, असा चिमटा त्यांनी काढला.

योगींनी तो शब्द वापरला
राऊत पुढे म्हणाले की, त्यांचेच नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही तो शब्द अनेकदा वापरला आहे. त्यांचे पंधरा ट्विट दाखवेन, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे हा शब्द वापरला आहे. भाजपच्या उत्तर प्रदेशातील अनेक नेते हा शब्द वापरतात, कारण तिथला ग्रामीण भागातील तो शब्द आहे. मी दिल्लीत आहे, महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात असतो तर कदाचित हा शब्द नसता वापरला. पण इथली ती बोलीभाषा आहे, त्यामुळे सर्वांना समजेल उमजेल असा शब्द वापरला. तो शब्द योग्यच, कुणाला काही तक्रार करायच्या असतील तर कराव्यात, असंही ते म्हणाले. 

 

Web Title: Sanjay Raut says- I never used unparliamentary words

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.