उद्धव ठाकरेंनी योगी आदित्यनाथांना चपलेने मारण्याची भाषा का केली? संजय राऊतांनी सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 04:15 PM2021-08-26T16:15:55+5:302021-08-26T16:19:00+5:30
राऊत म्हणाले, 'महाराष्ट्राचा बंगाल होणार नाही, राणेंच्या या विधानाचा अर्थ काय? तुम्ही बंगालमध्ये हरलात. जर तुम्ही हिच भाषा वापरत राहिलात तर महाराष्ट्रातही तुमची स्थिती अशीच असेल.
मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटकेनंतर जामीन मिळाला आहे. याच बरोबर आता त्यांना अटक केली जाणार नसल्याचेही महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, असे असतानाही हे प्रकरण अद्याप थांबलेले नाही. दोन्ही पक्षांकडून शाब्दिक द्वंद्व सुरूच आहे. यातच आता राणेंची भाषा अशीच राहिली तर महाराष्ट्रातही भाजपची स्थिती पश्चिम बंगालसारखीच होईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी, उद्धव ठाकरेंनी योगी आदित्यनाथांबद्दल केलेल्या चप्पल मारण्यासारख्या वक्तव्यावरही भाष्य केले. (Sanjay Raut says Uddhav thackerays chappal remark on yogi over insult to chhatrapati shivaji maharaj)
संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले विधान हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाबद्दलचे होते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना चप्पल घालून हार घातला जात नाही. ही आमची संस्कृती आणि परंपरा आहे. हा आमचा छत्रपती शिवाजी महाराजांप्रति असलेला सन्मान आहे.
The statement was made over an insult to Chhatrapati Shivaji Maharaj. No one garlands Shivaji Maharaj in Maharashtra while wearing slippers. It is our culture and tradition: Sanjay Raut, Shiv Sena, on row over Maharashtra CM Uddhav Thackeray's remarks on UP CM Yogi Adityanath pic.twitter.com/Ijwue27M5y
— ANI (@ANI) August 26, 2021
राऊत म्हणाले, 'महाराष्ट्राचा बंगाल होणार नाही, राणेंच्या या विधानाचा अर्थ काय? तुम्ही बंगालमध्ये हरलात. जर तुम्ही हिच भाषा वापरत राहिलात तर महाराष्ट्रातही तुमची स्थिती अशीच असेल.
खात्याचं काम करा, शहाणपणा करू नका -
संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. "तुम्हाला केंद्रीय मंत्री तुमच्या खात्याचं काम करण्यासाठी केलं आहे. इथं महाराष्ट्रात येऊल बेताल वक्तव्य करण्यासाठी नव्हे. खात्याचे काम करा. जास्त शहाणपणा करण्याची गरज नाही आणि तुम्ही अंगावर येण्याची भाषा करत असाल तर ही शिवसेना आहे. हे आधी लक्षात घ्या", असा हल्लाबोलही राऊतांनी राणेंवर केला आहे.
...तर शिवसैनिकच नारायण राणेंचा एनकाऊंटर करतील; शिवसेना पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याने खळबळ
योगींबद्दच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप नेत्याची तक्रार -
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात मुंबईतील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी बुधवारी उमरखेड पोलीस ठाण्यात केली आहे. याशिवाय महागाव, दिग्रस, पुसद येथील पोलीस ठाण्यातही भाजपाकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या असल्याचेही समजते.