Sanjay Raut vs BJP, Maharashtra Political Crisis: "किती घसरणार संजय राऊत? गेल्या दोन-अडीच वर्षात..."; भाजपाने सणसणीत प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 12:25 PM2023-02-19T12:25:49+5:302023-02-19T12:30:12+5:30

राऊतांनी रविवारी सकाळी ट्विटमधून निवडणूक आयोगावर आरोप केले होते

Sanjay Raut slammed by BJP leader Keshav Upadhye over allegations on election commission of India | Sanjay Raut vs BJP, Maharashtra Political Crisis: "किती घसरणार संजय राऊत? गेल्या दोन-अडीच वर्षात..."; भाजपाने सणसणीत प्रत्युत्तर

Sanjay Raut vs BJP, Maharashtra Political Crisis: "किती घसरणार संजय राऊत? गेल्या दोन-अडीच वर्षात..."; भाजपाने सणसणीत प्रत्युत्तर

googlenewsNext

Sanjay Raut vs BJP, Maharashtra Political Crisis: निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला दिले आहे. यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सुरु झाला आहे. राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा ठाकरे गटाकडून शिंदे गटाने ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ज्यांची त्यांचे शिवसेना भवन असणार आहे. कारण शिवसेना भवन हे शिवसेनेचे प्रतिक आणि नावावर आहे. ते पक्षाचे मुख्यालय आहे. यामुळे शिंदे गट शिवसेना, धनुष्यबाणानंतर आता शिवसेना भवनावरही दावा सांगणार असल्याची शक्यता आहे. याच दरम्यान संजय राऊतांनी गंभीर आरोप केला आहे. पण यावर भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांना चांगलंच सुनावलं आहे.

केशव उपाध्येंचा पलटवार!

"किती घसरणार संजय राऊत? गेल्या दोन अडीच वर्षाच नुसती बेछूट आरोपांची राळ उडवली एक आरोप ठोस सिध्द करू शकला नाहीत. नैराश्यातून माणूस बेताल बडबड करून चेष्टेचा विषय होतो म्हणून इतकही हस करून घेऊ नका. संघर्ष करणारे अण्णाभाऊ साठे कुठे आणि आरामात जगणारे तुमचे नेते कुठे?" असे ट्विट करत उपाध्येंनी राऊतांवर टीकास्त्र सोडले आहे.

काय आहे संजय राऊतांचे ट्विट?

"धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील असं म्हणत इशारा देखील दिला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  "माझी खात्रीची माहिती आहे.... चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत... हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे.. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील... देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते..." असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Web Title: Sanjay Raut slammed by BJP leader Keshav Upadhye over allegations on election commission of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.