Sanjay Raut : "नरेंद्र मोदींना मिळालेली मतं ही भोंदूगिरीतून मिळालेली मतं"; संजय राऊतांचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 11:18 AM2024-07-04T11:18:44+5:302024-07-04T11:31:40+5:30

Sanjay Raut And Narendra Modi : हाथरसच्या घटनेवर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. 

Sanjay Raut Slams Narendra Modi Over Hathras Stampede | Sanjay Raut : "नरेंद्र मोदींना मिळालेली मतं ही भोंदूगिरीतून मिळालेली मतं"; संजय राऊतांचं टीकास्त्र

Sanjay Raut : "नरेंद्र मोदींना मिळालेली मतं ही भोंदूगिरीतून मिळालेली मतं"; संजय राऊतांचं टीकास्त्र

हाथरस येथील पुलराई गावात धक्कादायक घटना घडली आहे. भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली, या दुर्घटनेत आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारी दीडच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. सत्संग आयोजकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याच दरम्यान हाथरसच्या घटनेवर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. 

"नरेंद्र मोदींना मिळालेली मतं ही भोंदूगिरीतून मिळालेली मतं आहेत" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा बुवा आहे. गुहेत जाऊन तपश्चर्या करतात. स्वत:ला देवाचा अवतार म्हणाल तर ही भोंदूगिरी आहे असंही म्हटलं आहे. "हाथरसमध्ये भोले बाबा आहे... ज्याच्यामुळे हे सर्व घडलं त्याच्यावर एकही गुन्हा दाखल झालेला नाही. कारण त्याला राजकीय संरक्षण आहे. ८० हजार लोकांना परवानगी देण्यात आली होती. पण अडीच लाख लोक कसे जमले?"

"हाथरसचे बळी हे अंधश्रद्धेचे बळी आहेत आणि त्या अंधश्रद्धेला राज्यकर्ते खतपाणी घालत आहेत. बुवा, महाराजांना राजकारणी प्रतिष्ठा देतात, त्यामुळेच अशाप्रकारच्या दुर्घटना घडताता. देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा बुवा आहे. गुहेत जाऊन तपश्चर्या करतात. स्वत:ला देवाचा अवतार म्हणाल तर ही भोंदूगिरी आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ४० आमदारांना घेऊन आसामला जातात आणि रेडे कापतात. यांच्यावर कोण कारवाई करणार. लोक हतबल आहेत. नरेंद्र मोदींना मिळालेली मतं ही भोंदूगिरीतून मिळालेली मतं आहेत. पहिल्यांदा आपल्या महाराजांच्या तोंडून मणिपूरचा उल्लेख झाला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मणिपूर हा गंभीर विषय आहे हे त्यांना समजलं. लाडकी बहीण योजना आलेली आहे, आता लाडका शेतकरी योजना आणा. रोज दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत. यावर राज्याचे अर्थमंत्री, मुख्यमंत्री यांनी अद्याप भाष्य केलेलं नाही" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: Sanjay Raut Slams Narendra Modi Over Hathras Stampede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.